OMG! दीपिका पदुकोण का कर्म्फटेबल नाही तिच्या गाऊनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2017 5:40 AM
कोणतीही अभिनेत्री कोणत्याही समारंभाला अथवा पार्टीला जाताना आपल्या कपड्यांच्याबाबतीत खूप सतर्क असते. त्या कपड्यांमध्ये आपण कर्म्फटेबल असावे असे तिला ...
कोणतीही अभिनेत्री कोणत्याही समारंभाला अथवा पार्टीला जाताना आपल्या कपड्यांच्याबाबतीत खूप सतर्क असते. त्या कपड्यांमध्ये आपण कर्म्फटेबल असावे असे तिला वाटत असते. त्यामुळे एखाद्या चांगल्या फॅशन डिझायनरकडून समारंभानुसार कपडे ती बनवून घेते. पण दीपिका पदुकोण ट्रिपल एक्स: दि रिटर्न आॅफ झेंडर केज या चित्रपटाच्या प्रिमियरच्यावेळी कपड्यांबाबतीत खूप सतर्क दिसली. ती सतत तिच्या कपड्यांना हात लावत असल्याचे दिसून आले. दीपिका पदुकोण गेल्या आठवड्यात विन डिजेलसोबत ट्रिपल एक्स: दि रिटर्न आॅफ झेंडर केज या चित्रपटाचे प्रमोशन करत होती. हा चित्रपट नुकताच प्रदर्शितदेखील झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हॉलिवूड अभिनेता विन डिझेलदेखील खास भारतात आला आहे. या चित्रपटाचे प्रमिमियरदेखील काही दिवसांपूर्वी मुंबईत विनच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या प्रिमियरला दीपिकाने एक सोनेरी रंगाचा सुंदर गाऊन घातला होता. या कार्यक्रमासाठी तिने खास नईम खान या फॅशन डिझायनरकडून हा गाऊन बनवून घेतला होता. तसेच तिने त्यावर साजेशा मेकअप आणि हेअरस्टाईलदेखील केली होती. त्यामुळे ती यात खूपच सुंदर दिसत होती. या चित्रपटाच्या प्रिमियरच्या आधी तिने पत्रकारांना मुलाखतीदेखील दिल्या. या मुलाखती देण्यासाठी दीपिका पत्रकारांच्या समोर येत असताना ती सतत गाऊन सांभाळत असल्याचे पाहायला मिळाले. तिच्याकडे मुलाखतीसाठी खूपच कमी वेळ असल्याने ती धावतच आली होती. त्यामुळे ती तिचा गाऊन सतत सांभाळत होती असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाच्यादरम्यान तिचा गाऊन छातीवरून घसरला अशा आशयाच्या पोस्ट आणि काही फोटो सोशल नेटवर्किंगवर फिरत आहेत. पण हे फोटो खोटे असून या कार्यक्रमात तिचे कपडे घसरले नसल्याचे उपस्थित लोक सांगतात. केवळ त्या कपड्यात ती कर्म्फटेबल नसल्याचे दिसून येत होते.