Join us  

​ OMG!! दीपिकाचे ‘ते’ स्केच म्हणे खोटे!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 11:24 AM

दीपिका पादुकोणच्या ‘पद्मावती’तील लूकबद्दल आज एक वेगळीच माहिती समोर आली. होय, काल-परवा या चित्रपटातील दीपिकाचा लूक कसा असेल, हे ...

दीपिका पादुकोणच्या ‘पद्मावती’तील लूकबद्दल आज एक वेगळीच माहिती समोर आली. होय, काल-परवा या चित्रपटातील दीपिकाचा लूक कसा असेल, हे आम्ही तुम्हाला सांगितले होते. दीपिकाच्या लूक दर्शवणारे एक स्केचही आम्ही तुमच्यासोबत शेअर केले होते. हे स्केच म्हणजेच ‘पद्मावती’तील दीपिकाचे फर्स्ट लूक आहे, असे सांगितले जात होते. पण आता हे स्केच खोटे असल्याचे समोर आले आहे. होय, चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टर श्रुती महाजन हिने आज याबाबत खुलासा केला.सोशल मीडियावर हे स्केच व्हायरल झाले होते. यात दीपिका महाराणीच्या भूमिकेत दिसते आहे. हे स्केच सोशल मीडियावर अपलोड होताच, लोकांनी ते शेअर करायला सुरुवात केली. लोकांनी हे स्केच खरे मानले कार, ते ‘पद्मावती’चे कास्टिंग डायरेक्टर श्रुतीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केले होते. मात्र हे स्केच माझ्या अकाऊंटवरून नाही तर माझ्या बनावट अकाऊंटवरून अपलोड झाले, ते खोटे आहे, असे श्रुतीने स्पष्ट केले. हे स्केच माझ्या बनावट अकाऊंटवरून अपलोड झालेयं. त्याचा माझ्याशी वा माझ्या चित्रपटाशी काहीही संंबंध नाही. निश्चितपणे दीपिका ‘पद्मावती’मध्ये असी दिसणार नाही. मी मीडियाला विनंती करते की, त्यांनी पुर्ण खात्री करूनच अशा बातम्या द्याव्यात, असे श्रुतीने म्हटले.दीपिका या चित्रपटात राणी पद्मावतीच्या भूमिकेत आहे. शाहीद कपूर हा दीपिकाच्या पतीची म्हणजेच राजा रावल रतन सिंह याची भूमिका साकारत आहे. तर रणवीर अल्लाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. चित्रपटात शाहिद व दीपिकाचे बरेच इंटिमेट सीन्स असल्याचेही ऐकिवात येतेय.