Join us

OMG : फरहान अख्तरने सोडला श्रद्धा कपूरमुळे चित्रपट !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2018 6:31 AM

श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा ऐकायला मिळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी श्रद्धाला फरहानसोबत काम करण्यासाठी एक चित्रपटात ...

श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा ऐकायला मिळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी श्रद्धाला फरहानसोबत काम करण्यासाठी एक चित्रपटात ऑफर देण्यात आली होती. मात्र तिने काम करण्यास नकार दिला. श्रद्धाला भीती आहे की जर फरहानसोबत काम केले तर लोकांना त्यांच्या पर्सनल लाईफबाबत गॉसिप करण्याची संधी मिळेल. त्यामुळे तिने नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा आणि फरहान तेव्हा रिलेशनशीपमध्ये होते. मात्र आता त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार 'डॉन3'मध्ये श्रद्धाला कास्ट करण्यात येणार होते. त्याचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार होता. मात्र जसे फरहानला कळेल की या चित्रपटात श्रद्धाला कास्ट करण्यात येणार आहे त्यांने दिग्दर्शन करण्याचे नाकारले. फरहानने ‘डॉन’ आणि ‘डॉन2’ दिग्दर्शित केला होता.फरहान आणि श्रद्धाने पहिल्यांदा ‘रॉक आॅन-२’ मध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगपासूनच दोघांमधील अफेअरच्या चर्चा समोर आल्या होत्या. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही समोर आले होते. मात्र श्रद्धाचे वडील शक्ती कपूर या नात्याच्या प्रचंड विरोधात होते. त्यांनी श्रद्धाला फरहानपासून दूर राहण्याची स्पष्ट शब्दात ताकीद दिली होती. तर श्रद्धामुळे  फरहानची पहिली पत्नी अधुनाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असे ही म्हणतात.  फरहान आणि अधुनाच्या घटस्फोटासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर जबाबदार असल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती.  फरहान आणि श्रद्धाची वाढती मैत्री अधुनाला अजिबात पसंत नव्हती. यावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. अखेर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.  ALSO READ :  अखेर कोणासोबत लग्न करणार श्रद्धा कपूर? पापा शक्ती कपूरने केला खुलासा!सध्या श्रद्धाचा तिचा आगामी चित्रपट ‘बत्ती गुल मीटर चालू’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि यामी गौतमसुद्धा दिसणार आहेत. श्रीनारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा चित्रपट यावर्षी ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.