फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. त्यातच एखादी बड्या व्यक्तीची पार्टी किंवा मोठा इव्हेंट असेल तर सेलिब्रिटी आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा. आरस्पानी सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी ऐश प्रसिद्ध आहे.
ऐशच्या फॅशन आणि स्टाईलचा जलवा फक्त बॉलीवुड पार्ट्या, इव्हेंट्स आणि केवळ भारतात पाहायला मिळतो असं नाही. सातासमुद्रापार कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही ऐशने आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने हॉलीवुडच्या मंडळींची आणि जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत.कान्स फेस्टिव्हलच्या लूकची नेहमीच चर्चा होत असते. आताही ती तिच्या हटके फॅशन स्टाईलमुळेच चर्चेत आली आहे.मात्र यावेळी तिचा लूक पाहून चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.
नुकतेच ऐश्वर्या अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसह पॅरिसला रवाना झाली. खरं तर, ती पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी गेली आहे. नुकतेच या फॅशन वीकचेही फोटो समोर आले आहेत. ऐश्वर्या रायचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. एरव्ही ऐश्वर्याची एक झलक दिसताच फुल ऑन फिदा होणारे चाहते यावेळी मात्र तिच्या फोटोंवर निगेटीव्ह कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. चाहत्यांना यावेळी ऐश्वर्याचा लूक काही आवडला नाही.
मेकअपमुळे तिचा चेहरा पूर्ण खराब झाला आहे. एवढेच नाही तर ऐश्वर्या रायच्या काही क्लोजअप फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या स्पष्ट दिसत असल्याचे दिसून येते. फॅशन वीक दरम्यान ऐशने व्हाईट कलरचा डिझाईनर गाऊन परिधान केल्याचे पाहायला मिळतंय. खराब मेकअप त्यात तो व्हाईट गाऊन आणि गुलाबी रंगाची लिपस्टीक अशा विचित्र मेकअपमध्ये ऐश्वर्या अजिबात सुंदर दिसत नाहीय. ऐश्वर्याने काहीही परिधान केलं तरी चांगले दिसेल असे अजिबात नाही. ती सुंदर आहे, पण तिचा मेकअप खराब झाला आहे अशा कमेंट सध्या तिच्या या फोटोंवर उमटल्याचे पाहायला मिळतंय.