OMG : करिना कपूरने ‘काली बिल्ली’ म्हणत बिपाशा बासूच्या लगावली कानशिलात!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 1:05 PM
बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर-खान नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. परंतु तिच्याभोवती फिरणारी चर्चा जर कुण्या आउटसायडरभोवती ...
बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर-खान नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. परंतु तिच्याभोवती फिरणारी चर्चा जर कुण्या आउटसायडरभोवती फिरायला लागली की, मग करिनाचा अवतार बघण्यासारखा असतो. २००१ मध्ये आलेल्या अब्बास मस्तानच्या ‘अजनबी’ चित्रपटाप्रसंगी असाच काहीसा किस्सा झाला. चित्रपटात करिना आणि बिपाशा बासू या दोघींच्याही प्रमुख भूमिका होत्या. मात्र करिनाच्या तुलनेत बिपाशाला अधिक प्रसिद्धी मिळत गेली. चित्रपटात बिपाशाने जोरदार अंगप्रदर्शन केल्याने ती जागोजागी चर्चेत राहू लागली. नेमकी हीच बाब करिनाला खटकली. टीव्ही, वृत्तपत्र, साप्ताहिक सगळीकडेच बिपाशाचा डंका वाजत होता. मात्र बिपाशाची ही प्रसिद्धी करिनाला पचविणे अवघड झाले होते. असे बहुधा पहिल्यांदाच घडत होते की, करिनाच्या तुलनेत दुसरी अभिनेत्री अधिक प्रसिद्धीझोतात आली होती. पुढे बिपाशाचे खच्चीकरण करण्यासाठी करिना सेटवर तिला टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नव्हती. तिने नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने ती उलट-सुलट बोलत असे. मात्र करिनाचा हा रोजचा त्रास बिपाशाला असह्य झाला होता. एक दिवस बिपाशानेही करिनाला जशास तसे उत्तर देण्याचे ठरविले. तसे तिने धाडसही केले. परंतु यावेळेस करिनाच बिपाशावर भारी पडली. करिनाने बिपाशाच्या जोरदार कानशिलात लगावली. दोघींचा वाद सोडविण्यासाठी जेव्हा अभिनेता बॉबी देओलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा करिनाचा राग बॉबीवरही बरसला. त्यालाही तिने सुनावले. काही काळानंतर करिनाला तिच्या चुकीची जाणीव झाली. तिने करिनाची माफी मागितली. त्यानंतर शूटिंगला सुरुवात झाली. बरेचसे वाद झाल्यानंतर हा चित्रपट अखेर रिलीज झाला. चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. बॉक्स आॅफिसवर चित्रपट हिट ठरला. मात्र चित्रपटाच्या यशाचा फायदा करिनापेक्षा बिपाशाला अधिक झाला. बिपाशाला अनेक चित्रपटांच्या आॅफर मिळू लागल्या. त्याचबरोबर दोघींनी पुन्हा एकत्र काम न करण्याची शपथही घेतली. परंतु पुन्हा एकदा ‘रेस’ या चित्रपटामध्ये या दोघींचा सामना झाला. जेव्हा ‘रेस’च्या शूटिंगदरम्यान बिपाशाचे नाव सैफ अली खानबरोबर जोडले गेले तेव्हा करिनाच्या रागाला पारावार उरला नव्हता. एका पत्रकार परिषदेदरम्यान जेव्हा करिनाला सैफ आणि बिपाशाविषयी विचारण्यात आले तेव्हा करिनाने बिपाशाला ‘काली बिल्ली’ असे संबोधले. शिवाय त्या प्रश्नाचे उत्तर देणेही टाळले. मात्र यावेळेस सैफने मध्यस्थी करीत बिपाशाची माफी मागितली. शिवाय पत्रकारांच्या प्रश्नांचेही उत्तर दिले. पुढे या दोघींची मैत्री करण्यासाठी सैफने मध्यस्थी केली. सध्या या दोघी चांगल्या मैत्रिणी असल्याचे बोलले जाते. परंतु त्यांच्यातील मैत्री किती पक्की आहे? हे सांगणे मात्र अवघडच म्हणावे लागेल.