करिश्मा कपूरची लाडकी लेक करिश्मा कपूरची मुलगी समायरा हिचा 16 वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. समायराची मावशी करिना कपूर तैमूरसोबत या बर्थ डे पार्टीला पोहोचली. करिना कपूरची आई आणि तैमूर दोघांसोबत बेबो करिश्माच्या घरी गेले होते. मात्र यावेळी करिना कपूरसह छोटा नवाब नव्हता. जन्मापासूनच तैमूरलाही सांभाळण्यासाठी नॅनी होती. त्यामुळे छोटे नवाबलाही सांभळण्यासाठी नॅनी असणारच.
तैमूर कायमच एका सगळ्यात जास्त नॅनीबरोबरच पाहायला मिळाला होता. नॅनी कायमच तैमूरसह त्याची सावली बनून होती. तैमूरची देखभाल करणारी नॅनीदेखील तैमूरप्रमाणेच लोकप्रिय झाली होती. करिनापेक्षा तैमूरला जास्त नॅनीच सांभाळले असावे. त्यामुळे तैमूरप्रमाणे नॅनी आता तैमूरच्या छोट्या भावालाही तितक्याच आपुलकीन सांभाळ करत असणार हे मात्र नक्की.
दुस-या बाळाच्या जन्म झाल्यापासून चाहत्यांनाही छोटे नवाबला पाहण्याची उत्सुकता आहे. मात्र अजूनपर्यंत बाळाची झलक पाहायला मिळाली नाही. अखेर महिला दिनाचे औचित्य साधत करिनाने चाहत्यांना छोटे नवाबची झलक दाखवली होती. बाळाला कुशीत घेतल्याचा फोटो तिने शेअर केला होता. शेअर केलेल्या फोटो बाळाचा चेहरा स्पष्ट दिसला नव्हता. त्यामुळे आता छोटे नवाबचा चेहरा कधी पाहायला मिळणार याच्याच प्रतिक्षेत सैफिनाचे चाहते आहेत.
प्रेग्नंसी दरम्यान अनेकदा कामाच्या निमित्ताने बेबो करिना फिरताना दिसायची. तसेच वर्कआऊट करत सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसायची. छोटे नवाबच्या जन्मानंतर करिना बाळासह विश्रांती करताना दिसली. हळूहळू आता पुन्हा एकदा करिना एक्टीव्ह होत आहे.
नुकतीच सैफसोबत ती बाहेर फिरताना दिसली. बाळाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच करिनाला अशारितीने फिरताना पाहिले गेले. यावेळी दोघांनी चेह-यावर मास्क लावले होते. यावेळी करिना मात्र काहीशी थकलेली दिसली. वाढलेल्या वजनामुळे करिनाच्या लूकमध्येही बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.