नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज 'लस्ट स्टोरीज'मधून प्रसिद्धी झोतात येणारी अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या आगामी चित्रपट 'कबीर सिंग'मुळे चर्चेत आहे. कियारा आणि शाहिद कपूर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच कियाराने एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिथे 'लस्ट स्टोरीज'मधील तिच्या वायब्रेटर सीनबद्दल वारंवार विचारले गेले.
यावेळी कियारा आडवाणीने सांगितले की, 'माझी आजी माझ्यासोबत रहायला आली होती. त्याचवेळी नेटफ्लिक्सवर लस्ट स्टोरीज प्रदर्शित झाली होती. मी माझ्या आजीला ती सीरिज दाखवली. इतकेच नाही तर माझ्या पालकांनीदेखील पाहिली. त्यांना लस्ट स्टोरीज खूप आवडली. माझ्या पालकांना माझ्या त्या सीनमुळे काहीही फरक पडला नाही. कारण या चित्रपटात काम करण्यास होकार दिला त्यावेळी माझ्या घरातल्यांना या सीनबद्दल माहित होते.'
हा चित्रपट २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.