Join us

OMG...! नेहा कक्कडचे 20 मिलियन्स फॉलोवर्स, असा साजरा केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 14:37 IST

'दिलबर दिलबर', 'आँख मारे' यांसारख्या गाण्यांमुळे लोकप्रिय झालेल्या नेहा कक्कडचे इंस्टाग्रामवर 20 मिलियन्स फॉलोवर्स झाले आहेत.

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कड सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या व्हिडिओमुळे नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळेस व्हिडिओ किंवा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली नसून इंस्टाग्रामवर तिचे 20 मिलियन्स फॉलोवर्स झाल्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. यानिमित्ताने तिने तिच्या फॉलोवर्सचे आभार मानले आहेत.

नेहाने ही 20 मिलियन्स फॉलोवर्स झाल्याची खुशखबर सोशल मीडियावर सांगत म्हटले की, 20 मिलियन फॉसोवर्ससोबत आता मी इंस्टाग्रामवर जास्त फॉलोवर्स असणारी भारतीय कलाकार ठरले आहे. माझ्या प्रत्येक फॉलोवर्सची मी आभारी आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी जग आहात. माझा प्रत्येक दिवस खास करण्यासाठी सर्वांची आभारी आहे. विशेष करून #NeHeartsची.

20 मिलियन फॉलोवर्स झाल्याच्या आनंदात नेहा कक्कडने आपल्या टीमसोबत पार्टी केली. ज्यात नेहा केक कापताना व पिज्जा पार्टी करताना दिसते आहे. 

गायन क्षेत्राशिवाय नेहा कक्कडने रिएलिटी शोचे परीक्षण केले आहे. मागील वर्षी ती इंडियन आयडॉलची परीक्षक होती आणि आता ती एका नवीन शोमध्ये परीक्षक म्हणून दिसणार आहे. लवकरच एका वाहिनीवर सुपरस्टार सिंगर शो दाखल होणार आहे. त्यात नेहा कक्कड, हिमेश रेशमिया व जावेद अली परीक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतात.

टॅग्स :नेहा कक्करइन्स्टाग्राम