Join us

OMG ! सुहाना खानच्या ‘या’ फोटोवर लोकांनी दिल्या अशाही कमेंट्स!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 6:21 AM

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत आहे. आपल्या सुंदर  फोटोंमुळे सुहाना ...

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत आहे. आपल्या सुंदर  फोटोंमुळे सुहाना तशीही चर्चेत असते. गत वर्षभरापासून सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येत आहेत. डेब्यूच्या या चर्चेतच सुहाना अधिक ग्लॅमरस दिसू लागलीयं. सध्या सुहानाचा असाच एक ग्लॅमरस फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होतो आहे. या फोटोवर लोक हॉट, व्हेरी हॉट अशा प्रतिक्रिया देत आहेत.suhana_khan3च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात किंगखानची लाडकी लेक व्हाईट शर्ट आणि शॉर्ट्समध्ये बसलेली आहे. सुहानाचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. अर्थात काहींनी या फोटोवरून सुहानाला ट्रोलही केले आहे.  सुहानाचे इन्स्टाग्रामवर प्रायव्हेट अकाऊंट आहे. मात्र तिची आई गौरी खान स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुहानाचे फोटो शेअर करत असते. स्टार किड असल्यामुळे सुहाना सतत चर्चेत असते. याआधीही तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांत सुहानाचा मेकओवर, लुक आणि तिचा  ड्रेस सेन्स सगळ्चे ‘फॅन्स टॉक आॅफ  द टाऊन’ बनले आहे.  ALSO READ : मालिबू बीचवर शाहरूख खानची मुलगी सुहानाचा दिसला बोल्ड अंदाज !मुंबईच्या धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी सुहानाने लंडनची निवड केली आहे. सुहानाचा भाऊ आर्यन खान हा सुद्धा सध्या लंडनमध्येच शिकतो आहे.  डान्सिंग आणि स्पोर्ट तिचे आवडीचे विषय. सुहानाने एक डान्सर म्हणून नाव कमवावे, असे शाहरूखला वाटतेय. अर्थात सुहानाने अभिनय क्षेत्रात यावे, यालाही शाहरूखची ना नाहीय. तसेही सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत. अलीकडे शाहरूखची लाडकी लेक सुहाना एक उत्तम अभिनेत्री बनणार, मोठे नाव कमावणार, असे भाकीत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी  यांनी वर्तवले होते. शाहरूख व गौरी खान यांनी २५ आॅक्टोबर १९९१ मध्ये लग्न केले होते. १९९७ मध्ये या दोघांचा मोठा मुलगा आर्यन याचा जन्म झाला होता. यानंतर २०००मध्ये सुहाना जन्मली होती. सन २०१३ मध्ये शाहरूख व गौरीचा तिसरा  मुलगा अबराम याचा जन्म झाला होता. अर्थात अबरामचा जन्म सरोगसीद्वारे झाला होता.