Join us

OMG!! हॉलिवूडमध्ये ‘बेस्ट’ नाही तर ‘वर्स्ट’च्या फे-यात फसली प्रियांका चोप्रा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 8:26 AM

‘बेवॉच’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यासाठी एक वाईट बातमी आहे. होय, एकीकडे प्रियांका बॉलिवूड सोडून ...

‘बेवॉच’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यासाठी एक वाईट बातमी आहे. होय, एकीकडे प्रियांका बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये पाय रोवण्यासाठी जीवतोड मेहनत घेतेय. दुसरीकडे तिचा पहिला वहिला ‘बेवॉच’ हा हॉलिवूडपट प्रियांकाच्या या मेहनतीवर पाणी फेरू पाहतोय. होय, ड्वेन जॉन्सनसोबतचा प्रियाकांचा हा हॉलिवूडपट २०१७ मध्ये रिलीज झाला आणि बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. यातील प्रियांकाच्या अभिनयाचेही म्हणावे तसे कौतुक झाले नाही. आता तर या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियांकासाठी आणखीच वाईट बातमी आहे. होय, प्रियांकाच्या ‘बेवॉच’ला ३८ व्या वार्षिक गोल्डन रेस्पबेरी अवार्ड्सच्या विविध श्रेणी नामांकन मिळाले आहे. आता पुरस्कारासाठी नामांकन म्हटल्यावर तर ही बातमी प्रियांकासाठी आनंदाची म्हणायला हवी. पण नाही. कारण हा पुरस्कार त्या वर्षीच्या सर्वाधिक फ्लॉप चित्रपटाला दिला जातो. याच पुरस्कारासाठी प्रियांकाच्या ‘बेवॉच’ला नॉमिनेट करण्यात आले आहे. ‘वर्स्ट पिक्चर’,‘वर्स्ट रिमेक’,‘रिप आॅफ आॅर सिक्वल’ आणि ‘वर्स्ट स्क्रीनप्ले’ अशा कॅटेगरीत प्रियांकाच्या ‘बेवॉच’ला नॉमिनेट करण्यात आले आहे. आता सर्वात वाईट चित्रपटाच्या श्रेणीत प्रियांकाच्या हॉलिवूडपटाला स्थान मिळत असेल, तर यापेक्षा वाईट काय म्हणता येईल?गोल्डन रेस्पबेरी अवार्ड्स दरवर्षी दिले जातात. आॅस्कर अवार्ड्सच्या एकदिवस आधी या पुरस्कारांची घोषणा केली जाते. पण या पुरस्कारांचा आॅस्करशी काहीही संबंध नाही. येत्या ३ मार्चला गोल्डन रेस्पबेरी अवार्ड्सची घोषणा होणार आहे. आता या पुरस्कारात प्रियांकाचा ‘बेवॉच’ कुठल्या श्रेणीत पुरस्कार मिळवतो, ते बघूच. हा पुरस्कार मिळवून प्रियांका नाराज होणे साहजिक आहे. पण देसी गर्ल नाऊमेद होणार नाही, ही मात्र खात्री आहे.ALSO READ : आॅस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी सज्ज आहे प्रियांका चोप्रा! नामांकनाची करणार घोषणा!!सध्या प्रियांका अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको3’मध्ये बिझी आहे. ‘क्वांटिको’च्या दोन्ही सीझनमध्ये प्रियांका एलेक्स पारिशची भूमिका साकारताना दिसली होती.  प्रियांकाची  ही भूमिका जगभरातील लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती.  याच भूमिकेने प्रियांकाला हॉलिवूडमध्ये नवी ओळख दिली. यानंतर एकापाठोपाठ एक हॉलिवूड सिनेमेही तिला मिळालेत.