बॉलिवडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा नेहमीच आपल्या स्टाइल स्टेटमेंटने जगभरातील रसिकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरले. प्रियंकाने नुकतेच बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सहोळ्यातही यावर्षी कोणता नवा ट्रेंड पाहायला मिळणार? कोणाची फॅशन सर्वाधिक हटके ठरणार याकडे साऱ्यांच्या नजरा होत्या. या सोहळ्याच्या सुरुवातीलाच ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं असं काहीसं घडलं प्रियंका चोप्रासोबत. यावेळी प्रियंका साऱ्यांसाठी आकर्षणाची केंद्र ठरली.
तसेही प्रियंका जिथं जाते तिथे आपल्या स्टाइल आणि फॅशनने उपस्थितांच्या नजरा आकर्षित करुन घेतेच. प्रियंकाने कायमच आपली स्टाइल जपली आहे. या पुरस्कार सोहळ्यात प्रियंकाने परिधान केलेल्या ड्रेसचे जितकं कौतुक झालं तितकंच आता या ड्रेसच्या किंमतीवरही चर्चा रंगत आहे.
प्रियंकाने परिधान केलेला ड्रेस सा-यांच्या नजरा आकर्षित करत असला तरी किंमत ड्रेसची किंमत वाचून तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही. या डोळे दिपवणा-या आणि सगळ्यांना घायाळ करणा-या ड्रेसची किंमत तब्बल 925,186 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. या आकर्षक ड्रेसमुळे प्रियंकाचे सौंदर्य आणखी खुलून गेले होते.आपल्या या मनमोहक आणि आकर्षक स्टाइलने तिनं सा-यांचीच मने जिंकली आहेत.
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतचे प्रियकांने निक जोनाससोबत एक फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर निक जोनास आणि प्रियंका ट्रेडिंग कपल ठरतात.फोटोशूटमध्ये प्रियंकाने परिधान केलेले जॅकेटमुळे प्रियंकाला चाहत्यांच्या रागाचा सामना करावा लागत आहे. तुम्ही जर प्रियंकाचा हा फोटो नीट पाहिला तर काली मातेची प्रतिमा असणारे जॅकेट तिनं परिधान केल्याचे दिसेल. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच नेटीझन्सचा संताप अनावर झाला आणि प्रियंकाला अतिशय तिव्र शब्दांत ट्रोल केले गेले.हा फोटो जोनास ब्रदर्सचे गाणे 'सकर फॉर यू'च्या शूटिंगदरम्यानचा असल्याचे बोलले जात आहे. प्रियंकाच्या या जॅकेटमुळे भारतीच्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर झाला होता. म्हणून सोशल मीडियावर प्रियंकाला नेटकऱ्यांची टीकेची झोड उठली होती.