Join us  

OMG! राधिका आपटेला एका सिनेमाच्या ऑडिशनसाठी करावा लागला होता फोन सेक्स, तरीही....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 4:45 PM

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे नेहमी तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते.

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे नेहमी तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते. राधिकाने अनेक चित्रपटात काम केले आहे आणि विविध भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तिने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान बनवले आहे. मात्र तिला इथपर्यंत पोहचण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. इतकेच नाही तर राधिकाला एकदा ऑडिशनसाठी फोन सेक्स करावा लागला होता.

नेहा धुपियाच्या बीएफएफ व्हिथ वोगमध्ये राधिका आपटे राजकुमार रावसोबत आली होती. तेव्हा तिने एक खुलासा केला. त्यावेळी राधिकाने सांगितले की, 'देव डी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला फोनवर अश्लील गोष्टी करायच्या होत्या. मी ते केल्यादेखील कारण मला ऑडिशनमध्ये सिलेक्ट व्हायचे होते. मला हे सर्वांसमोर करायचे होते आणि मी खूप चांगला अभिनय केला. तरीही माझी निवड झालीच नाही'  

जेव्हा राधिकाची न्यूड क्लिप व्हायरल झाली होती तेव्हा तिच्या ड्रायव्हरपासून ते वॉचमॅनपर्यंत सर्वांनी तिला ओळखले होते. ग्रॅजिया मासिकाला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली, 'जेव्हा क्लीन शेव्हच्या शूटिंग दरम्यान न्यूड क्लिप लीक झाली तेव्हा मला वाईट ट्रोल करण्यात आले होते आणि त्याचा परिणाम माझ्या जीवनावर झाला होता. बरेच दिवस मी घराबाहेर पडली नाही. मीडिया काय बोलेल याचा विचार केला नव्हता. पण न्यूड क्लिप व्हायरल झाली तेव्हा माझ्या ड्रायव्हरपासून ते वॉचमॅनपर्यंत सर्वांनी ओळखले होते. मग या सर्व गोष्टींकडे कानाडोळा केला.'

राधिका पुढे म्हणाली की, जेव्हा पार्च्ड चित्रपटासाठी न्यूड झाले, तेव्हा मला वाटले आता लपवण्यासारखे काही नाही. पण तेव्हाही न्यूड सीन देणे फार सोपे नव्हते. स्क्रिनवर न्यूड होणे फारच भीतीदायक होते. पण आता मी  पूर्णपणे तयार आहे.'

टॅग्स :राधिका आपटे