Join us

OMG...! राधिका आपटेचे या अभिनेत्यासोबतचे बोल्ड सीन झाले लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 18:11 IST

अभिनेत्री राधिका आपटे बोल्ड फोटो आणि सीनमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा ती बोल्ड सीनमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री राधिका आपटे बोल्ड फोटो आणि सीनमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा ती बोल्ड सीनमुळे चर्चेत आली आहे. राधिका लवकरच स्लमडॉग मिलेनिअर फेम अभिनेता देव पटेल याच्यासोबत द वेडिंग गेस्ट चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच ते दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटातील एक बोल्ड सीन लीक झाला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. 

राधिका आपटे आणि देव पटेल त्यांचा आगामी चित्रपट द वेडिंग गेस्टचे सध्या प्रमोशन करत आहेत. नुकताच या चित्रपटातील राधिका आणि देव यांचा एक बोल्ड सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोल्ड सीन व्हायरल होण्याची राधिकाची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी तिचे पार्च्ड सिनेमातील बोल्ड सीन लीक झाले होते. 

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार राधिकाने सांगितले की, ‘द गेस्ट वेडिंग या चित्रपटात आणखी खूप सुंदर सीन आहेत. परंतु लोकांच्या मानसिकतेमुळे फक्त बोल्ड सीन लीक झाला आहे. या सीनमध्ये माझ्यासोबत देव पटेल देखील आहे. पण सीन माझ्या नावानेच लीक होत आहे. पुरुष अभिनेता देव पटेल याच्या नावाखाली हा सीन का लीक झाला नाही’ असा प्रश्न राधिकाने उपस्थित केला.

द वेडिंग गेस्ट चित्रपटाशिवाय राधिका लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रात अकेली है चित्रपटात झळकणार आहे.

टॅग्स :राधिका आपटेदेव पटेल