OMG : रिया सेनने चक्क वेटरकडे केली सेक्सची डिमांड!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2017 3:53 PM
कॉन्ट्रोव्हर्शियल मर्डर केसवर आधारित ‘डार्क चॉकलेट’मध्ये शीना बोराची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिया सेन काही दिवसांपूर्वी एका शॉर्ट फिल्ममध्ये लेस्बियनची ...
कॉन्ट्रोव्हर्शियल मर्डर केसवर आधारित ‘डार्क चॉकलेट’मध्ये शीना बोराची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिया सेन काही दिवसांपूर्वी एका शॉर्ट फिल्ममध्ये लेस्बियनची भूमिका साकारताना बघावयास मिळाली होती. तिच्या या भूमिकेविषयी चर्चा रंगू लागली असतानाच तिने एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते की, ती एवढी सेक्सी आहे की, मुलीदेखील तिच्यासोबत सेक्स करू इच्छितात. रियाच्या या वक्तव्यानंतर तिच्या लेस्बियन भूमिकेविषयीची चर्चा काहीशी निवळली होती; मात्र आता ती एका भलत्याच कारणाने चर्चेत आली आहे. मित्रासोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या रियाने चक्क वेटरकडेच सेक्सची डिमांड केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याचे झाले असे की, रिया मुंबईमधील अंधेरी स्थित एका रेस्टॉरंटमध्ये मित्रासोबत डिनरसाठी गेली होती. या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणचे ‘फेमस नॉटी कॉकटेल सेक्स आॅन द बीच’ ही डिश आहे. जी ग्राहकांच्या आग्रहास्तव आॅफर केली जाते; मात्र रियाला कॉकटेल ड्रिंक प्यायचे नव्हते. तिला बॉइल अंड्यांपासून बनविलेल्या एका खास डिशची चव चाखायची होती. रेस्टॉरंटमधील वेटरला ही बाब समजल्यानंतर त्यांनी लगेचच रियाला ‘एग्ज आॅन द बीच’ ही डिश आॅफरही केली. यादरम्यान रिया खूपच थकलेली होती. ती तिच्या पार्टनरसोबत मेन्यूविषयी डिस्कस करीत होती. त्याचवेळी वेटरने रियाला आॅर्डरविषयी विचारले; मात्र रियाच्या तोंडून असे काही शब्द आलेत की, वेटर दंग राहिला. ती वेटरला चक्क Could I have some SEX please असे म्हणाली. रियाचे हे शब्द ऐकताच वेटरचा चेहरा असा काही फुलला की, त्याला काय करावे हेच काही काळ सूचत नव्हते; मात्र रियाला ती काय बोलली याची तिला नंतर जाणीव झाली. कळत-नकळत तिच्या तोंडून बोलले गेलेले शब्द परत घेण्यासाठी तिचा आटापिटा सुरू झाला. रियाने लगेचच वेटरला Could I have some eggs please? असे म्हटले. रियाचे शब्द ऐकताच वेटर धीरगंभीर उभा राहिला; मात्र त्याच्याकडे बघून रियाला मात्र हसू आवरता आले नाही. सेक्स स्कॅण्डलमध्ये रियाचे नावरिया सेन त्यावेळेस सेक्स स्कॅण्डलमध्ये गोवली गेली होती, ज्यावेळेस तिचा एमएमएस व्हायरल झाला होता. या एमएमएसमध्ये रिया आणि अस्मित पटेल इंटिमेट होताना बघावयास मिळत होते. दोघांचा हा एमएमएस त्यांच्या सिनेमाच्या रिलिजच्या काही दिवस अगोदरच आउट केला होता. ज्यास दोघांना सिनेमाचाच हा एक भाग असल्याचे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता; मात्र या एमएमएसमुळे दोघांची चांगलीच बदनामी झाली होती.