शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिने बॉलिवूडच्या दिशेने पहिले पाऊल टाकले, असे समजायला हरकत नाही. जगप्रसिद्ध वोग इंडिया या फॅशन मॅगझिनच्या ताज्या अंकाच्या कव्हर पेजवर सुहाना झळकली आणि सगळीकडे तिचीच चर्चा रंगली. सुहानाच्या या पहिल्या-वहिल्या फोटोशूटचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलेत. या फोटोशूटमधील सुहानाचा स्टनिंग अवतार पाहून अनेक जण तिच्या प्रेमात पडले. अनेकांनी तिचे कौतुक केले. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात. मात्र या सगळ्यांत सुहानाचा ग्लॅम वर्ल्डमधील हा डेब्यू पाहून नाक मुरडणारेही बरेच निघाले. मग काय, सुहानाच्या निमित्ताने पुन्हा एका नेपोटिजम अर्थात बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून चर्चा सुरु झाली.
बॉलिवूडमधील घराणेशाहीचे आणखी एक मोठे उदाहरण, असे म्हणून लोकांनी सुहानाच्या या फोटाशूटवर टीका केली.