Join us

OMG...! तैमूरसोबत डेटवर जायचंय या ३१ वर्षीय अभिनेत्रीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 13:20 IST

अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री करीना कपूर यांचा छोटा नवाब म्हणजेच तैमूर खूप लोकप्रिय असून बॉलिवूडचे सेलेब्सदेखील त्याचे चाहते आहेत.

'पिंक' फेम अभिनेत्री तापसी पन्नू व बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'बदला'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या तापसी आगामी चित्रपट 'बदला'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने बॉलिवूडच्या एका खानसोबत डेटवर जायचे असल्याची इच्छा व्यक्त केली. 

तापसीला एका प्रमोशनदरम्यान बॉलिवूडमध्ये कोणासोबत डेटवर जायला आवडेल, असे विचारल्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून सगळेच अचंबित झाले. ती म्हणाली की, 'बॉलिवूडमध्ये मला तैमूर अली खानसोबत डेटवर जायला आवडेल.'

दोन वर्षाच्या तैमूरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्रीदेखील त्याचे फॅन झाले आहेत. आता तापसीच्या तैमूरसोबत डेटवर जायला आवडेल या म्हणण्यावर आता करीनाची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.  

'बदला' चित्रपटात तापसी पन्नूअमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त अमृता सिंग, टोनी ल्यूक, मानव कौल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :तैमुरतापसी पन्नूबदलाअमिताभ बच्चनकरिना कपूर