Join us

OMG! ​चंकी पांडेच्या मुलीबद्दल हे काय बोलून गेली फराह खान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 7:01 AM

अनेकदा गमती-गमतीत असे काही घडते की, वादळ उठतं. कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेत्री फराह खान हिच्याबाबतही हेच घडले. चंकी पांडेची ...

अनेकदा गमती-गमतीत असे काही घडते की, वादळ उठतं. कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेत्री फराह खान हिच्याबाबतही हेच घडले. चंकी पांडेची मुलगी अनन्याबद्दल फराह असे काही बोलून गेली की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.चंकीची पत्नी भावना पांडे हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगी अनन्याचा एक सुंदर फोटो पोस्ट केला. या फोटोत अनन्या कमालीची सुंदर दिसतेय. हा फोटो फराहने बघितला अन् नको ते बोलून गेली. ‘प्लीज हिची डीएनए टेस्ट करा. चंकी पांडेची मुलगी आणि इतकी सुंदर,’ अशी कमेंट फराहने केली.  फराहचा सेन्स आॅफ ह्युमर खूप चांगला आहे, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. पण फराहच्या या कमेंटचा विचार केल्यास त्यातून नको ते अर्थच जास्त निघतात. त्यामुळेच फराहचा हा ‘विनोद’ अर्थातच लोकांना पचला नाही. मग काय, या विनोदानंतर फराह स्वत:च ‘विनोद’ बनली. एक खराब जोक, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या.ALSO READ : सुहाना खानच नव्हे तर ‘हे’ स्टारकिड्सदेखील बिकिनीमध्ये दिसतात सेक्सी आणि स्टायलिश !फराह खान तिच्या तिखट विनोदासाठी जाणली जाते. अनेकदा ती स्वत:ची आणि पती शिरीष कुंदर याचीही टिंगल उडवताना दिसते. चंकी पांडेची ती खूप चांगली मैत्रिण आहे. पण तरिही हा विनोद चंकी व त्याची पत्नी भावना या दोघांच्या जिव्हारी न लागो, म्हणजे मिळवले.चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची कळतेय. खुद्द बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अनन्याला लॉन्च करणार असल्याचे कळतेय. मध्यंतरी ‘स्टुडंट आॅफ इ ईअर2’मध्ये अनन्या दिसणार अशीही चर्चा होती. आता चंकीच्या इतक्या सुंदर मुलीला कुठे ब्रेक मिळतो, ते बघूच.