Join us

OMG!! काय म्हणता? कथाचं नाही तर ‘न्यूटन’चे पोस्टरही ‘चोरी’चे??

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 9:47 AM

राजकुमार रावचा ‘न्यूटन’ हा सिनेमा तिकडे आॅस्करवारीसाठी जाणार हे पक्के झाले अन् इकडे या आॅस्करवारीवरून एका वादाला तोंड फुटले. ...

राजकुमार रावचा ‘न्यूटन’ हा सिनेमा तिकडे आॅस्करवारीसाठी जाणार हे पक्के झाले अन् इकडे या आॅस्करवारीवरून एका वादाला तोंड फुटले. होय, ‘न्यूटन’ हा सिनेमा इराणी चित्रपट ‘सीक्रेट बॅलेट’वर बेतलेला अर्थात त्याची कॉपी असल्याचा आरोप सध्या होत आहे. (अर्थात दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.) आता हा वाद कमी की काय म्हणून, आता या चित्रपटाचे पोस्टरही अनेकांर्थाने ‘कॉपी’ असल्याचे म्हटले जात आहे. होय, ‘न्यूटन’चे पोस्टर सत्यजीत रे यांच्या ‘गणशत्रू’ या चित्रपटाच्या पोस्टरशी बहुतांश मिळते जुळते असल्याचे आढळून आले आहे.आॅस्कर विजेते सत्यजित रे यांचा ‘गणशत्रू’ हा सिनेमा १९९० मध्ये रिलीज झाला होता. ‘गणशत्रू’ची कथा नार्वेचा नाटककार हेनरिक इस्बेन याच्या ‘अ‍ॅन इनिमी आॅफ द पिपल’ या नाटकावर आधारित होती. एक डॉक्टर गावातील अंधश्रद्धेविरोधात लढतो आणि त्याचे नाव गणशत्रू पडते, असे याचे कथानक होते. ‘न्यूटन’चे पोस्टर आणि ‘गणशत्रू’चे त्यावेळचे पोस्टर यात बºयाचअर्थी समानता आहेत.दरम्यान ‘न्यूटन’ची कथा इराणी चित्रपट ‘सीक्रेट बॅलेट’ची कॉपी असल्याचा आरोप दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी  त्यांनी धुडकावून लावला आहे.माझा चित्रपट छत्तीसगडवर बेस्ट आहे. मी या कथेवर काम करत होतो तेव्हा ‘सीक्रेट बॅलेट’चे नावही मी ऐकले नव्हते.  माझा चित्रपट ‘सीक्रेट बॅलेट’ची कॉपी असल्याचे आरोप होऊ लागलेत, तेव्हा कुठे मी हा चित्रपट बघितला. ‘न्यूटन’ कोणत्याही चित्रपटाची कॉपी असता तर बर्लिन, ट्रिबेकामध्ये तो दाखविण्याची संधी आम्हाला मिळाली असती का? आमचा  चित्रपट कोणत्याही चित्रपटाची कॉपी  नाही तसेच, तो कोणापासून प्रेरितसुद्धा नाही असे मसूरकर यांनी म्हटले आहे. आता पोस्टर कॉपी असल्याच्या आरोपावर मसूरकर काय बोलतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.ALSO READ : ​‘या’ पाच भारतीय चित्रपटांच्या आॅस्करवारीवरूनही झालायं वाद!!‘सीक्रेट बॅलेट’ या चित्रपटाला बाबाक पयामी नेने यांनी दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट २००१ मध्ये रिलीज झाला होता. ‘न्यूटन’आणि या चित्रपटाच्या कथेच बºयाच अंशी साम्य आहे.