Join us

Opps…मलायकाला सुपरहॉट अंदाज फ्लाँट करणे पडले महागात,लाजिरवाण्या घटनेचा करावा लागला सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 12:35 IST

मलायका देखील फोटोग्राफर्सना पोझ देत होती. पण पोझ देत असताना तिचा क्रॉप टॉप खूपच डिप असल्याने तिचे क्लेव्हेज स्पष्ट दिसत होते.

छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा जिथे जाते तिथे तिच्या हटके आणि सुपस्टायलिश लूकची चर्चाही होतेच. मलायकाची एक झलक पाहण्यासाठी सारेच आतुर असतात. पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटवर अवतरताच सा-यांच्या नजरा तिच्याकडेच वळतात. असेच काहीसे घडले खरे, पण यावेळी तिच्या सुपरहॉट अंदाजामुळे नाही तर तिच्या स्टायलिश ड्रेसिंग स्टाइलमुळे तिला लाजिरवाण्या घटनेचाही सामना करावा लागला. यावेळी मलायकाच्या ड्रेसने तिला ऐनवेळी दगा दिला आणि त्यामुळे ती ऊप्स मोमेंटची बळी ठरली. ही घटना घडताना कुणी पाहिलं नसेल अशा मोठ्या विश्वासाने मलायका मीडियाच्या कॅमे-यांना पोज देत होती. मात्र त्याचवेळी या सगळ्या गोष्टी कॅमे-यातही कैद होत होत्या.

फोटो समोर येताच सोशल मीडियावर ती पुन्हा एकदा ट्रोल होत आहे. तिच्या या ड्रेसिंग स्टाइलची एकीकडे खिल्ली देखील उडवली जात आहे. तर दुसरीकडे तिच्यावर जोरदार टीकाही होत आहे. मलायकाचे हे फोटो समोर येताच  अवघ्या काही तासांतच हे फोटो एक लाखांहून अधिक नेटिझन्सनी पाहिले आहेत.

अशा गोष्टींचा सामना अनेकदा मलायकाला करावा लागला आहे. मलायका अरोराची तर एका फंक्शनमध्ये इतकी वाईट अवस्था झाली होती की, फोटोग्राफर्स तिचे फोटो काढत असतानाच तिने कोणालाही काहीही न सांगता इव्हेंटमधून अक्षरशः पळ काढला होता.

मलायका एका स्टोरच्या उद्घाटनासाठी गेली होती. या इव्हेंटला केवळ तिनेच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला तिने लाँग पँट आणि त्यावर क्रॉप टॉप घातला होता. या टॉपवर तिने त्याच रंगाचे जॅकीट देखील घातले होते. मलायका त्या लूकमध्ये खूपच छान दिसत होती. तिने इव्हेंटला हजेरी लावताच सगळ्या कॅमेऱ्यामॅनने तिची छबी कॅमेऱ्यात टिपायला सुरुवात केली.

मलायका देखील फोटोग्राफर्सना पोझ देत होती. पण पोझ देत असताना तिचा क्रॉप टॉप खूपच डिप असल्याने तिचे क्लेव्हेज स्पष्ट दिसत होते. मलायकाने टॉप सांभाळण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. टॉप जास्तच खाली येत आहे हे मलायकाच्या लक्षात येताच तिने तिथूच पळ काढला होता.

टॅग्स :मलायका अरोरा