Join us  

"घाणेरडं कृत्य करताना एकदाही..." कोलकाता बलात्कार प्रकरणी भूमी पेडणेकरची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 2:17 PM

पश्चिम बंगालमधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलाात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

Bhoomi Pednekar On kolkata Rape Case : पश्चिम बंगालमधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलाात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आहे. ९ ऑगस्टच्या दिवशी हॉस्पिटलच्या सेमीनार हॉलमध्ये या महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आणि मोठी खळबळ माजली. सध्या देशभरात या घटनेच्या विरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे डॉक्टरही संपावर गेले आहेत. अशातच कलाविश्वातील मंडळीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देत असल्याचं पाहायला मिळतंय.

या घटनेच्या निषेधार्थ बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. शिवाय रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तिने देशवासियांना आवाहन देखील केलं आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत त्यात लिहलंय, "रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! लहानपणापासून ऐकत आलोय,- फलानेच्या बहिणीचा नवरा तिला खूप मारहाण करतो. पण, बिचारी त्याला सोडू शकत नाही. त्याचबरोबर, त्याच्या बहिणीचा अपघात झाला. आपल्याला वाटतं हे काही हुंड्याचं प्रकरण आहे, त्यामुळे त्याकडे कोणी जास्त लक्ष देत नाही. शिवाय अमक्याच्या बहिणीची ती कॉलेजला जाताना काही तरुणांनी छेड काढली. अशा गोष्टी कानावर पडायच्या. एकाच्या बहिणीला मुलं त्रास देत होती तिने आवाज उठवला तर तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला. तमक्याची बहीण रात्री घरी येत असताना मित्रासोबत बसमधून प्रवास करत होती आणि तिचा बलात्कार झाला. शाळेत जात होती बलात्कार झाला. शेतात काम करत होती बलात्कार झाला. रात्र पाळीचे काम करत असताना एका तरुणीवर अतिप्रसंग झाला".

पुढे भूमी म्हणते, "२०२४ उजाडला तरीही आम्हाला आमच्या रक्षणाकरिता भावाची गरज भासते, का? आणि कशासाठी? असं म्हणतं अभिनेत्रीने सवाल उपस्थित केला आहे. आपला भाऊ कोणा-कोणापासून आपला बचाव करेल. असं घाणेरडं कृत्य करताना त्यांना एकदाही आपल्या आई-बहिणीचा विचार नाही येत का? कुठे गेली यांची भीती, कुठे गेली माणुसकी? या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या बहिणींच्या रक्षणासाठी जाब विचारा. आपल्या बहिणी आणि मुलींकरिता ही लढाई लढण्यासाठी पुढे या. शिवाय आपल्या कुटुंबातील मुलांना चांगलं शिक्षण द्या आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करा. कारण येणाऱ्या पिढीला या गोष्टी ऐकायला नाही मिळाल्या पाहिजेत , ज्या आम्ही ऐकल्या आहेत.

वर्कफ्रंट-

२०१५ मध्ये आयुष्यमान खुरानासोबत तिने 'दम लगा के हईशा' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाने भूमीला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळवून दिली.

'टॉयलेट एक प्रेमकथा', 'शुभ मंगल सावधान', 'सोन चिडिया', 'पती पत्नी और वो', 'बाला', 'सांड की आंख', 'बधाई दो', 'रक्षाबंधन' असे अनेक हिट सिनेमे तिने दिलेत.

टॅग्स :भूमी पेडणेकर पश्चिम बंगाललैंगिक शोषणबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडियासोशल व्हायरल