मनीषा कोईराला(Manisha Koirala)ने ९० च्या दशकात आपल्या अभिनय आणि सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. शेवटची ती हीरामंडी या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाली. नुकत्याच एका मुलाखतीत मनीषा कोईरालाने शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले. मनिषाने सांगितले की, जेव्हा शाहरुख स्टार बनला नव्हता आणि माउंट मेरी अपार्टमेंटमध्ये राहत होता तेव्हा त्याच्या घराचे वातावरण कसे होते. मनीषा कोईरालाने १९९८ मध्ये रिलीज झालेल्या 'दिल से' चित्रपटात शाहरुखसोबत काम केले होते.
शाहरुख खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल 'पिंकविला'शी बोलताना मनीषा म्हणाली की, जेव्हा दोघेही चित्रपटात नवीन होते तेव्हा ती पहिल्यांदा या अभिनेत्याला भेटली होती. मनीषाच्या म्हणण्यानुसार, ती फक्त शाहरुख आणि गौरीसोबतच हँग आउट करायची. शाहरुख त्यावेळी माउंट मेरी अपार्टमेंटमध्ये राहत होता.
शाहरूखने मनिषाला दिला होता हा सल्ला
मनिषा कोईराला म्हणाली, 'शाहरुख माझा सुरुवातीपासूनचा मित्र आहे. मला आठवतंय की, मी माझ्या सर्व सामानासह त्याच्या माउंट मेरी अपार्टमेंटमध्ये गेले होते. त्याच्या फ्लॅटच्या फरशीवर चटई अंतरलेली होती. आम्ही सगळे त्यावर बसून गप्पा मारायचो. मनीषाने असेही सांगितले की, शाहरुखने तिला आधी मुंबईत स्वतःचे घर घेण्याचा सल्ला दिला होता. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला हा सल्ला देणारा शाहरुख पहिला होता.
वर्कफ्रंटप्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर मनीषा कोईराला २०२४ साली संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी: द डायमंड बझार' या मालिकेत दिसली होती. आता ती दुसऱ्या सीझनमध्येही दिसणार आहे, ज्याचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. शाहरुख खान 'किंग'मध्ये व्यस्त आहे, ज्यात सुहानाशिवाय अभिषेक बच्चन दिसणार आहे.