Join us  

सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला दिली भेट, म्हणाला - "त्यांची कहाणी म्हणजे.."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 9:21 AM

सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीप हुड्डाने अंदमानातील सेल्युलर जेलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातल्या भावना सांगितल्या (randeep hooda)

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. रणदीपने स्वतः या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कहाणी रणदीपने मोठ्या पडद्यावर आणली. या सिनेमाचं आणि रणदीपच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. रणदीपने सावरकरांच्या भूमिकेसाठी केलेली जीवतोड मेहनत जाणवली. अशातच सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला भेट दिली आहे.

रणदीपची सेल्युलर जेलला सपत्नीक भेट

रणदीप हुड्डा म्हणाला, 'वीर सावरकरांची कथा वाचताना आणि ती पडद्यावर आणताना मी त्या कहाणीत खूप गुंतलो. वीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वाला जाणून घेणाऱ्या लोकांकडून जेव्हा माझं  कौतुक होतं तेव्हा खूप छान वाटतं. त्यांची कथा मी खूप चांगल्या आणि दमदार पद्धतीने मोठ्या पडद्यावर आणली आहे. आज आम्ही इथे सेल्युलर जेलमध्ये आलो आहोत, जिथे विनायकजींना शिक्षा झाली होती. 50 वर्षे जन्मठेपेची शिक्षा...सर्व शक्तिशाली क्रांतिकारकांना इंग्रजांनी देशापासून दूर एकांतात ठेवले होते. हेच ते ठिकाण आहे...'

रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराने सन्मानित

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त मुंबईत नुकतंच स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळ्याचं वितरण करण्यात आलं. अभिनेता रणदीप हुड्डा या पुरस्काराचा मानकरी ठरला. रणदीप हुड्डाने अलीकडेच सिनेमात साकारलेली सावरकरांची भूमिका प्रचंड गाजली. पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना रणदीपने स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. 

टॅग्स :रणदीप हुडाविनायक दामोदर सावरकरअंडमान आणि नोकोबार द्वीप समूह