कतरिना कैफ (Katrina Kaif) नेहमीच चर्चेत असते. चाहते कतरिनाच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यामुळे तिच्या चित्रपटांशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी ते उत्सुक असतात. कतरिनाचा नुकताच टायगर ३ रिलीज झाला. त्यानंतर आता चाहते कतरिनाच्या मेरी ख्रिसमसची वाट पाहत आहेत. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आतापर्यंत तीन वेळा पुढे ढकलण्यात आला आहे.
मेरी ख्रिसमसमध्ये कतरिना कैफसोबत विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी एक निवेदन जारी करून चित्रपट पुढे ढकलण्याचे कारण स्पष्ट केले आहे. निर्मात्यांनी निवेदन शेअर केले आहे. त्यांनी लिहिले की, प्रत्येक चित्रपट निर्मात्याप्रमाणे आम्ही हा चित्रपट खूप प्रेम आणि उत्कटतेने बनवला आहे. तथापि, २०२३च्या शेवटच्या दोन महिन्यांत बॅक टू बॅक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. म्हणून, आम्ही ठरवले आहे की आम्ही हा मौजमजेचा हंगाम वाढवत आहोत आणि आमचा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.
८ डिसेंबर रोजी होणार होता प्रदर्शितमेरी ख्रिसमस तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे. याआधी हा चित्रपट डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित होणार होता पण त्यावेळी रणवीर सिंगच्या सर्कससोबत झालेल्या संघर्षामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर ८ डिसेंबर २०२३ रोजी रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता तो पुन्हा पुढे ढकलण्यात आले आहे. आता हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हे आहेत कलाकार मेरी ख्रिसमसबद्दल सांगायचे तर, रमेश तौरानी, जया तौरानी, केवल गर्ग आणि संजय रौट्री यांनी याची निर्मिती केली आहे. तर श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कतरिना आणि विजयसोबत संजय कपूर, विनय पाठक, टिनू आनंद हे सहाय्यक भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात राधिका आपटे आणि अश्विनी काळसेकर यांच्या भूमिका आहेत.