बॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोण-रणवीर सिंग हे कपल अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीर यांनी 14 नोव्हेंबरला कोंकणी तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने लग्न केले. त्यांचा विवाहसोहळा इटलीतील लेक कोमो या नयनरम्य परिसरात पार पडला. लग्नानंतर त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी बंगळूरू आणि मुंबईत रिसेप्शन दिले होते. या दोघांच्या लग्नांमुळे बरेच तरूण व तरूणी खूश तर काही दुःखी झाले आहेत. तसेच एकेकाळी दीपिकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका बॉलिवूडच्या अभिनेत्यांने नुकतेच आपले दुःख थेट भाभी म्हणत दीपिकाकडे व्यक्त केले. कोण असेल हा अभिनेता हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक असाल ना. हा अभिनेता म्हणजे सर्वांचा लाडका चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन.
दीपिका पादुकोणने तिच्या विवाहानंतर पहिल्यांदाच निकलोडियन किड्स चॉईस अवॉर्डसच्या माध्यमातून लोकांसमोर आली. दीपिकाने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. कार्यक्रमाचा सुत्रसंचालक कार्तिक आर्यन सर्वांसमोर अगदी खुल्या मनाने तिची मस्करी करत होता. डोमच्या आतील सुत्रांच्या मते दीपिकाचा विवाह झाल्याने कार्तिकला दु:ख झाले आणि त्याला नाईलाजाने तिला भाभी म्हणून हाक मारावी लागली.एका सेगमेंटदरम्यान कार्तिक आर्यन म्हणाला,तुम मेरी होती, अगर तुम रणवीर भैया की नही होती. अब तो तुम्हे दीपिका भाभी बुलाना पडेगा. यानंतर कार्तिकने दीपिकला एक लोकप्रिय कवितादेखील म्हणायला सांगितली, ती म्हणजे मछली जल की रानी है. भलेही कार्तिक आर्यन दुःखी झाला असला तरी उपस्थितांना त्याने हसायला भाग पाडले.