कलाकारांच्या आयुष्यात अनेक चढउतार येतात. सिनेइंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांना काम मिळाले पण फारसे यश मिळाले नाही. यात अभिनेता विवेक मुशरानचा देखील समावेश आहे. विवेकने २८ वर्षांपूर्वी सौदागर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. इतकेच नाही तर त्याला रातोरात स्टार बनविले.
'सौदागर' चित्रपटानंतर त्याच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्सच्या रांगा लागल्या होत्या. मात्र एक वेळ अशी आली की त्याचे चित्रपट चालवणेही कठीण झाले होते. त्यानंतर विवेक हिरो ऐवजी सहकलाकाराच्या भूमिकेत दिसू लागला.
‘सौदागर’ चित्रपटातील विवेक आणि मनीषा कोईराला यांच्यावर चित्रीत झालेले ‘इलू इलू’ गाणे सुपरहिट झाले. या चित्रपटानंतर विवेकच्या नशिबात असे वळण आले की, त्याला मुख्य भूमिकेव्यतिरिक्त चित्रपटांमध्ये काम मिळणे कठीण झाले.
हल्लीच तो ‘तमाशा’, ‘पिंक’, ‘बेगम जान’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमात दिसला. चित्रपटांमध्ये काम कमी होताच विवेक छोट्या पडद्याकडे वळला. विवेक अनेक मालिकांमध्ये काम करताना दिसला आहे. ज्यात ‘सोनपरी’, ‘परवरीश’ आणि ‘निशा या सारख्या मालिकांचा समावेश आहे. विवेकचा लूकही २८ वर्षांत खूप बदलला आहे.