टेलिव्हिजन, मराठी चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेत्री मृणाल ठाकूरने छाप उमटविली आहे. गेल्या वर्षी हृतिक रोशनचा रिलीज झालेला चित्रपट सुपर ३०मध्ये मृणाल मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली. त्यानंतर ती बाटला हाउसमध्येही ती झळकली आहे. मृणालचा एक किस्सा सध्या ऐकायला मिळतो आहे. हा किस्सा तिनेच एका चॅट शोदरम्यान सांगितला होता. पॉकेटमनी मिळवण्यासाठी हीच मृणाल कधीकाळी वडिलांचे बूट पॉलिश करायची.
मृणाल ठाकूरने चॅट शोमध्ये सांगितले की, चित्र काढणे, रंगवणे, मेहंदी काढणे या गोष्टींची मला फार आवड होती. त्याकाळात पॉकेटमनीसाठी थोडे जास्त पैसे मिळावे म्हणून मी लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढायला जायचे. शिवाय वडिलांचे बूट पॉलिश करायचे. वडिलांचे बूट पॉलिश केल्यावर मला दीड रुपये मिळायचे. पण ही काम करण्यातसुद्धा एक वेगळीच मज्जा होती.
सलमान खानचा चित्रपट 'सुलतान'साठी सुद्धा तिने ऑडिशन दिले होते. मात्र ऐनवेळी मेकर्सनी या चित्रपटासाठी अनुष्का शर्माला साईन केले. 'लव सोनिया' या चित्रपटात मृणालने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.