Join us

"माझ्यासोबत एक रात्र...", बॉलिवूडच्या अभिनेत्याने ममताकडे केलेली विचित्र मागणी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:45 IST

Mamta Kulkarni : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. जेव्हापासून ही अभिनेत्री भारतात परतली आहे, तेव्हापासून तिचे नाव कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) सध्या चर्चेत आहे. जेव्हापासून ही अभिनेत्री भारतात परतली आहे, तेव्हापासून तिचे नाव कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीने महाकुंभात पोहोचल्यानंतर संन्यास घेतला आणि तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वरही करण्यात आले. मात्र या वादाला तोंड फुटल्यानंतर या अभिनेत्रीलाही या पदावरून हटवण्यात आले. ममता कुलकर्णीची वादात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. एकदा तिने बॉलिवूडच्या एका टॉपच्या अभिनेत्यावर वन नाईट स्टँडची ऑफर दिल्याचा आरोप केला होता.

ममता कुलकर्णीने एका जुन्या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, अभिनेता बॉबी देओलने तिला वन नाईट स्टँडसाठी प्रपोजल दिले होते. बरसात चित्रपटाच्या शूटिंगसाठी बॉबी देओल हॉटेलमध्ये थांबला होता आणि अभिनेत्रीही त्याच हॉटेलमध्ये राहात होती, असे अभिनेत्रीने सांगितले होते. त्या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती देखील होता आणि त्यानेच अभिनेत्रीची बॉबीशी ओळख करून दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली आणि बॉबीला ममता कुलकर्णी आवडू लागली, तरीही ममता त्याला फक्त आपला मित्र मानत होती.

अभिनेत्याला घालवायची होती एक रात्र?अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की बॉबी देओलने एकदा अभिनेत्री ममताला वन नाइट स्टँडची ऑफर दिली होती. जेव्हा अभिनेत्याने हे ममताला सांगितले तेव्हा तिचा विश्वास बसला नाही, त्यानंतर अभिनेत्रीने त्याला यासाठी त्याच्या गर्लफ्रेंडची परवानगी घ्यायला सांगितले. खरेतर त्यावेळी बॉबी देओल पूजा भटला डेट करत होता. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले आणि बॉबीने १९९६ मध्ये तान्या देओलशी लग्न केले.

टॅग्स :ममता कुलकर्णीबॉबी देओल