बॉलिवूडमधील एकतर्फी प्रेमकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2016 11:03 PM2016-10-19T23:03:49+5:302016-10-20T09:42:48+5:30

‘प्रेम’ ही अतियश रम्य आणि आनंददायी गोष्ट आहे, हे खरे आहे. परंतु प्रेमाचा हा आनंद उपभोगाचा असेल तर प्रेमाचे ...

One-on-one romance in Bollywood | बॉलिवूडमधील एकतर्फी प्रेमकथा

बॉलिवूडमधील एकतर्फी प्रेमकथा

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">‘प्रेम’ ही अतियश रम्य आणि आनंददायी गोष्ट आहे, हे खरे आहे. परंतु प्रेमाचा हा आनंद उपभोगाचा असेल तर प्रेमाचे स्वरूप दुतर्फी हवे एकतर्फी नको. मात्र रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘ऐ दिल है मुश्किल’चा डायलॉग काहीतरी वेगळेच सांगतोय. यात रणबीर म्हणतो, ‘एकतरफा प्यार की ताकत ही कुछ और है. औरौ के रिश्तो की तरह ये दो लागो मे नही बंटता, सिर्फ मेरा हक है इसपे’. या डॉयलॉगवरून हा चित्रपटात एकतर्फी प्रेमाची क था दाखविली असावी असे वाटते. अशाच एकतफर् ी प्रेमावर आधारित चित्रपटांची ही रंजक माहिती वाचकांसाठी...


 
रांझना (2013): दिग्दर्शक आनंद एल राय यांचा ‘रांझना’ हा चित्रपटाची कथा एकतर्फी प्रेम करणाºया युवकावर आधारित होती. लहानपणापासून एका मुस्लिम नावाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करणारा नायक दाक्षिणात्य अभिनेता धनुषने साकारला. तर मुस्लिम युवतीची भूमिका सोनम कपूरने केली होती. प्रेम मिळविण्यासाठी नायकाने अजमाविलेल्या वेगवेगळ्या क्लुप्त्या व यामुळे खलनायक ठरलेला नायक धनुषने मोठ्या दमाने साकारला आहे. सोनम कपूर ‘रांझना’ला आपल्या करिअरमधील टर्निंग पार्इंट मानते. 


 
डर (1993) : शाहरुख खान, जुही चावला, सनी देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘डर’ हा चित्रपट यश चोपडा यांनी दिग्दर्शित केला होता. राहुल (शाहरुख) किरण (जुही चावला)हिच्यावर एकतर्फी प्रेम करतो. तिला मिळविण्यासाठी तो किरणच्या प्रियकराला (सनी दओल) मारण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटातील ‘तू है मेरी कीरण’ हे गाणे चांगलेच लोकप्रिय ठरले होते. या चित्रपटानंतर शाहरुखच्या करिअरला चांगलीच गती मिळाली होती. यानंतर त्याला याच प्रकारचे कथानक असलेल्या अनेक चित्रपटांच्या आॅफर आल्या. 


 
दिल तो पागल है (1997) : यश चोपडा यांचा आणखी एक प्रेम त्रिकोण म्हणजे ‘दिल तो पागल है’ यात शाहरुख खान, माधुरी दीक्षित व करिश्मा कपूरच्या भूमिका होत्या. राहुलच्या (शाहरुख)प्रेमात असलेली निशाची भूमिके तील करिश्मा कपूरने चांगलीच प्रसंशा मिळविली होती. राहुल व निशा एकाच बॅण्डमध्ये काम करतात. निशाचे राहुलवर प्रेम आहे पण राहुल अचानक पूजाच्या (माधुरी) प्रेमात पडतो. दोघांचा एकमेकावर जीव जडतो. दुसरीकडे पूजावर अजय हा युवक देखील प्रेम करतोय अशी या चित्रपटाची कथा होती. 


 
हम दिल दे चुके सनम (1999): संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात अजय देवगने अशा पतीची भूमिका साकारली आहे जो आपल्या पत्नीच्या प्रियकराचा शोध घेतोय. नंदिनी (ऐश्वर्या राय) व समीर (सलमान खान) यांच्यात फुलत जाणारे प्रेम हा या चित्रपटातील सर्वांत आनंदाची बाजू आहे. नंदिनीचे लग्न वनराजशी (अजय देवगन) झाल्यावर प्रेमाचा नंदिनीला कळलेला अर्थ हा या चित्रपटाचा आत्मा ठरतो.
 

 
लम्हे (1991) : यश चोपडा दिग्दर्शित आणखी एक लव्ह ट्रँगल म्हणजे लम्हे. या चित्रपटाचा नायक विरेन (अनिल कपूर) त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पल्लवीच्या (श्रीदेवी) प्रेमात पडतो. मात्र ती नकार देते. पल्लवीवर कायम एकतर्फी प्रेम करणाºया विरेनच्या जीवनात अचानक पल्लवीसारखी दिसणारी पूजा नावाची एक मुलगी येते. पूजा ही पल्लवीची मुलगी असून ती विरेनच्या प्रेमात पडते. ज्या कारणाने विरेनच्या प्रेमाला पल्लवी नकार देते, तेच कारण यावेळी त्याच्याकडे आहे. 


 
बर्फी (2012): अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बर्फी’ हा चित्रपट पारंपारिक लव्ह ट्रंगलपेक्षा वेगळा आहे. नायक बर्फी (रणबीर कपूर) हा मुक बधीर असला तरी तो श्रृतीचे (इलियाना डिक्रुझ) मन जिंकण्यात यशस्वी ठरतो. मात्र यादरम्यान त्याला गतीमंद झिलमील (प्रियांका चोप्रा) हिला त्याची अधिक गरज असल्याचे वाटते. दुसरीकडे लग्न झाल्यावरही श्रृतीचे बर्फीवर प्रेम आहेच. ती आपला संसार सोेडून बर्फीकडे येते. मात्र बर्फी झिलमीलला सोडायला तयार नाही. अखेरच्या श्वासापर्यंत प्रेमाचा हा त्रिकोण कायम राहतो. 


 
एकतर्फी प्रेमाचे नाते जुणेच 
बॉलिवूडमध्ये अनेक दिग्दर्शकांनी प्रेम त्रिकोण असलेले चित्रपट तयार केले आहेत. मात्र प्रेम त्रिकोण म्हटल्यावर सर्वांत आधी ज्या चित्रपटाचा उल्लेख होतो तो म्हणजे अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, राखी व रेखा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मुक्कदर का सिंकदर’या चित्रपटाचा. कमल हसन-श्रीदेवीचा ‘सदमा’, रणबीर कपूर-नर्गिस फाखरीचा ‘रॉकस्टार’, शाहरुख-प्रिती झिंटा-सैफ अली खानचा ‘कल हो ना हो’, आमिर खान-उर्मिला मातोडकर-जॅक श्रॉफचा ‘रंगीला’, शाहरुख-सुचित्रा कृष्णमूर्तीचा ‘कभी हा कभी ना’, अक्षय खन्ना-ऐश्वर्या-अनिल कपूरचा ‘ताल’, कॅटरिना कैफ-जॉन अब्राहम-नील नितीन मुकेशचा ‘न्यू यार्क’ या चित्रपटातही एकतर्फी प्रेमाची कथा पहायला मिळाली आहे. 

Web Title: One-on-one romance in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.