बॉलीवुडचा हिरो नंबर वन म्हणजे गोविंदा. आपला डान्स,कॉमेडी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभिनय याने गोविंदाने रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमात नंबर वन बनत त्याने रसिकांना खळखळून हसवलं, कधी संवेदनशील भूमिका साकारत रसिकांना रडवलंही तर कधी कधी रोमँटिक अंदाजात त्याने सा-यांची मनं जिंकली. त्यामुळे गोविंदा रसिकांचा लाडका चिची बनला. विरारचा छोरा अशी ओळख असणा-या गोविंदाचं आयुष्य मुंबापुरीतच गेलंय. गोविंदाने त्याच्या करिअरमध्ये 165 पेक्षा अधिक सिनेमांमध्येकाम केले. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या़ कॉमेडी, ड्रामा, रोमान्स, अॅक्शन अशा प्रत्येक रूपात तो प्रेक्षकांना भावला.
९० च्या दशकात गोविंदाने एक से बढकर एक सुपरहिट सिनेमा दिलेत. या सिनेमांनी गोविंदा सुपरस्टार बनवलं... मात्र आता वेळ बदललीय.अलीकडच्या काळात किल दिल, हॅपी एंडिंग, फ्राइडे, रंगीला राजा असे त्याचे काही सिनेमे आलेत़ पण ते सगळेच फ्लॉप ठरलेत. रसिकांचा आवडत्या चिचीच्या जीवनाविषयी ब-याच गोष्टी कायमच ऐकायला मिळतात. मात्र गोविंदाच्या आयुष्याविषयी काही गोष्टी अजूनही समोर आलेल्या नाहीत.
दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द गोविंदानेच याविषयी खुलासा केला होता. की जेव्हा दोन सुपरस्टार एकाच सिनेमात काम करतात. तेव्हा दोघांमध्ये तुलना होते, कोणाला जास्त प्रेफरन्स द्यायचा यावरही मतभेद होतात. एका कारणामुळे सलमान खानसोबत काम करण्यास टाळत राहिल्याचे गोविंदाने सांगितले. पार्टनर सिनेमात मात्र गोविंदाला त्याचा बनवलेला हा नियम तोडावा लागला होता.
2007 साली आलेल्या पार्टनर सिनेमात गोविंदा आणि सलमान खान या जोडीने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. मात्र या सिनेमानंतर गोविंदाच्या करिअरला उतरती कळा लागली. गोविंदाला बॉक्स ऑफिसवर म्हणावं तसं यश मिळालं नाही. या सिनेमानंतर ऑनस्क्रीन बनलेले दोन्ही पार्टनर सलमान खान आणि गोविंदा पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार असल्याच्या चर्चा होत्या तसे काही झाले नाही. या सिनेमानंतर सलमान आणि गोविंदा दोघांनीही कधीच एकत्र काम केले नाही यामागेही खास कारण आहे.