सध्या पियालीची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवीला पूर्ण स्वातंत्र दिले होते. बºयाचशा प्लॅस्टिक सर्जरी केल्यामुळेच श्रीदेवी ५४ व्या वर्षात ४० वर्षाच्या वाटायच्या. पियाली बॉलिवूड सेलिब्रिटींच्या क्लोज असल्याचे बोलले जात आहे. पियालीने लिहिले की, ‘श्रीदेवी यांचे चाहत्यांना असे वाटायचे की, त्या कायम सुंदर दिसाव्यात. जेव्हा मी त्यांना पाच वर्षांपूर्वी भेटली होती, तेव्हा त्या खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांच्यावर नेहमीच वजन मेनटेन करण्याचा दबाव होता. त्या नेहमीच हा विचार करायच्या की, त्यांच्या चेहºयावर कधीच सूरकुत्या पडू नयेत.}}}} ">"Her implants, weight loss and excess doses of Botox shots regularly could also be the cause of Cardiac arrest."Piyali Ganguly’s Comments on Sri Devi’s sad demise. pic.twitter.com/KZct876IgA— P Purewal (@PenduShehari) February 25, 2018
श्रीदेवींच्या व्यक्तिगत आयुष्यातील एक सत्य होतेय व्हायरल; वाचून तुम्हाला धक्का बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 3:51 PM
श्रीदेवीच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार रात्री १ वाजेच्या दरम्यान ...
श्रीदेवीच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार रात्री १ वाजेच्या दरम्यान त्यांचे पार्थिव खासगी जेट विमानाने भारतात आणले जाईल. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार केले जातील. दरम्यान, श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या खासगी जीवनाशी निगडीत एक खुलासा सध्या वाºयासारखा व्हायरल होत आहे. पियाली गांगुली नावाच्या एका सोशल मीडिया यूजरने इन्स्टाग्राम अकाउंटवर श्रीदेवींबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. पियालीने लिहिले की, श्रीदेवीला कधीच त्यांच्या नॅचरल ब्युटीवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्यांनी बºयाचदा प्लॅस्टिक सर्जरी केली. त्या नेहमीच स्वत:ला सुंदर बघू इच्छित होत्या. याबाबतचा त्यांच्यावर खूप दबाव होता. सुंदर दिसण्यासाठीचा हाच दबाव त्यांच्या मृत्यूचे कारण बनले आहे. याच दबावामुळे त्यांना कार्डिअक अरेस्ट आला. पुढे पियालीने लिहिले की, ‘श्रीदेवी नेहमीच सर्जरीकरिता कॅलिफोर्नियाच्या एका क्लिनिकमध्ये जात असत. त्यांचे पती त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत असल्याने त्यांनी यास कधीच विरोध केला नाही. वास्तविक त्यांनी श्रीदेवीला याविषयी विरोध करायला हवा होता. पियालीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. पियालीच्या या पोस्टला यूजर्स वायफळपणा असल्याचे म्हणत आहेत. आता या पोस्टमध्ये किती सत्यता आहे, हे पियाली आणि श्रीदेवी यांच्या परिवारातील सदस्यच जाणून आहेत. मात्र या अगोदरही अशाप्रकारच्या बातम्या समोर आल्या आहेत की, श्रीदेवी यांनी प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.