Orry booked for consuming alocohol at Mata Vaishno Devi Base Camp: बॉलिवूड स्टारकीड्ससोबतच्या फोटोंमध्ये सतत सोबत दिसणारा आणि विचित्र पोज देणारा ओरहान अवत्रामणीवर ऊर्फ ओरी अडचणीत सापडला आहे. ओरीसह ८ जणांविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. माता वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कँपवर मद्यप्राशन करताना त्यांना पकडण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ओरी आणि त्याचे ७ मित्र माता वैष्णोदेवी बेस कँप येथील कटरा या भागातील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन करत होते. जम्मू काश्मीर पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. यामध्ये काही रशियन नागरिकही आहेत. ओरी, दर्शन सिंह, पार्थ रैना, ऋत्विक सिंह, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि रशियन नागरिकांची नावं समोर आली आहेत. वैष्णोदेवी मंदिर परिसरात आणि काही अंतरापर्यंत मांसाहारी अन्न आणि दारुचं सेवन करण्यास बंदी आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि स्थानिक नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर(FIR) दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची विशेष टीम बनवण्यात आली आहे. एसएसपी परमवीर सिंह यांनी या ८ जणांविरोधात सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. धार्मिक स्थळाचं पावित्र्य भंग केल्याप्रकरणी ओरीविरोधात आता पोलिस आक्रमक झाले आहेत.