Join us

लग्नात आहेर देण्याऐवजी ऑरी त्यांच्याकडूनच घेतो पैसे; एका कार्यक्रमासाठी घेतो इतके लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 15:17 IST

Orry: लग्नात आहेर देण्याऐवजी ऑरी त्यांच्याकडूनच घेतो पैसे; एका लग्नासोहळ्यासाठी त्याला मिळतात इतके लाख रुपये

सध्या कलाविश्वात स्टारकिड्स सोबतच ओरहान अवत्रमणी अर्थात ऑरीची (orry) जोरदार चर्चा आहे. बॉलिवूडमधील नामांकित सेलिब्रिटींपासून ते अगदी अंबानींच्या लग्नसोहळ्यापर्यंत अनेक कार्यक्रमांमध्ये ऑरी आवर्जुन हजेरी लावत असतो. आतापर्यंत ऑरीने निसा देवगणपासून ते पॉपस्टार रिहानापर्यंत अनेक देशविदेशातील सेलिब्रिटींसोबत फोटो काढला आहे. विशेष म्हणजे ऑरी कोणत्याही लग्नकार्यात गेल्यानंतर भेटवस्तू किंवा आहेर देत नाही. तर, त्याबदल्यात तो स्वत:च लाखो रुपयांचं मानधन घेतो.

ऑरीने 'फोर्ब्स इंडिया'ला मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये त्याने त्याचा इन्कम सोर्स सांगितला आहे. त्यानुसार, ऑरी लग्नकार्य वा पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी मानधन घेत असल्याचं त्याने सांगितलं. इतकंच नाही तर तो या कार्यक्रमांसाठी किती लाखांची रक्कम स्वीकारतो याचा आकडाही सांगितला आहे. 

"सध्या तरी माझा उद्देश एकच आहे तो म्हणजे सगळीकडे आनंद पसरवायचा. लोकांना ते आवडतं. त्यामुळे मलाही प्रेरणा मिळते. याच कारणामुळे मी वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाऊ शकतो. तिथे मी स्वत:ही आनंदी राहतो आणि इतरांनाही खूश ठेवतो. वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणं हाच माझ्या कमाईचा मुख्य स्त्रोत आहे. लोक मला पाहुणे म्हणून नाही तर मित्र म्हणून या लग्नसमारंभांसाठी बोलावतात", असं ऑरी म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "त्यांच्या लग्नकार्यांसाठी मी उपस्थित रहावं यासाठी ते मला स्वखुशीने, आनंदाने १५ ते ३० लाख रुपये देतात. माझी त्या ठिकाणी उपस्थिती असणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आणि आनंदाचं असतं."

दरम्यान, ऑरी अत्यंत लक्झरी लाइफस्टाइल जगत असून अलिकडेच तो बिग बॉस १७ मध्ये झळकला होता. यावेळी त्याने परिधान केलेलं घड्याळ तब्बल ९ लाख ८० हजार रुपयांचं होतं. तर, शूज दीड लाखांचे होते.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा