Join us

काय सांगता! अलका याज्ञिकचा चाहता होता 'ओसामा बिन लादेन', घरात मिळालेल्या गाण्यांच्या कॅसेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 10:21 AM

अल्का याज्ञिक यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की त्यांचा चाहता एक दहशतवादी आहे.

आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका अल्का याज्ञिक (Alka Yagnik) आज ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ९० च्या दशकात प्रत्येक चित्रपटात अल्का यांचं गाणं असणारच हे जवळपास निश्चितच असायचं. अल्का यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट गाणी गायली. त्यांच्या आवाजाचे, गाण्यांचे चाहते काही कमी नाहीत. मात्र त्यांचा एक असाही चाहता होता ज्याचा अल्का याज्ञिक यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. तो म्हणजे 'ओसमा बिन लादेन'. (Osama Bin Laden)

'अल कायदा'चा दहशतवादी आणि ९/११ च्या बॉम्बस्फोटातील मास्टरमाईंड ओसामा बिन लादेन अलका याज्ञिक यांचा मोठा चाहता होता. याचा खुलासा अमेरिकन तपास यंत्रणांनी केला होता. एका गुप्त ऑपरेशनमध्ये अमेरिकन कमांडोंनी पाकिस्तानातील एटलाबादमध्ये लपलेल्या ओसामाचा त्याच्या घरात घुसून खात्मा केला होता. तेव्हा त्याच्या घरी अलका याज्ञिक यांच्या गाण्यांच्या कॅसेट्स आणि कॉम्प्युटरमध्ये व्हिडिओ मिळाल्याची माहिती अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी दिली होती. अलका याज्ञिक, उदित नारायण आणि कुमार सानू यांचा ओसामा चाहता असल्याचं त्याच्याकडील गाण्यांच्या कलेक्शनवरुन लक्षात आलं. 

ओसामाच्या पाकिस्तानातील ठिकाणावरुन सीआयएला जवळपास 18 हजार कागदपत्रांची फाईल, 80 हजार ऑडिओ आणि इमेज फाईल सापडल्या होत्या. याशिवाय लादेनकडे अजय देवगन आणि काजोलच्या  'प्यार तो होना ही था' चित्रपटातील 'अजनबी मुझको इतना बता', सलमान खान आणि माधुरी दिक्षितच्या 'दिला तेरा आशिक' चित्रपटाचं टायटल साँगची कॅसेटही सापडली होती. तसंच 'टॉम अॅण्ड जेरी' कार्टूनही कॉम्प्युटरमध्ये होतं. इंग्रजी शिकण्याचे व्हिडीओ त्यात सामील होते. 

प्रेमविवाहानंतर लगेच 'या' कारणामुळे घेतला वेगळंं राहण्याचा निर्णय, अल्का याज्ञिक यांची अनोखी प्रेमकहाणी

'पायल की झंकार' सिनेमातील 'थिरकता अंग लचक झुकी' या गाण्यापासून त्यांनी करिअरला सुरुवात केली. परदेसी परदेसी, ताल से ताल मिला, सुरज हुआ मधम, चुरा के दिल मेरा या गाण्यांपासून ते आताच्या अगर तुम साथ हो या गाण्यांपर्यंत अल्का यांनी रसिकांना गाण्यांची मेजवानीच दिली. कुमार सानू, उदित नारायण या ९० च्या दशकातील गायकांसोबत त्यांचे ड्युएट सॉंग्स चांगलेच गाजले. 

टॅग्स :ओसामा बिन लादेनअलका याज्ञिकबॉलिवूडउदित नारायणकुमार सानू