Join us

ओसामा बिन लादेन होता अलका याज्ञिकचा नंबर वन फॅन, गायिका म्हणाली - "त्याच्यामध्येही एक छोटा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:56 IST

Osama Bin Laden And Alka Yagnik :अलका याज्ञिकच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. करोडोंच्या फॅन फॉलोइंगमध्ये एक दहशतवाद्याचाही समावेश आहे, जो त्याचा नंबर वन फॅन असल्याचे बोलले जात आहे. हा दहशतवादी म्हणजे ओसामा बिन लादेन.

रुखी-सुखी रोटी, कयामत, मुझसे मोहब्बत, ये बंधन तो आणि जिंदगी से जंग यांसारख्या गाण्यांना स्वरसाज देणारी गायिका अलका याज्ञिक(Alka Yagnik)ने अनेक चार्टबस्टर गाणी गायली आहेत. अलका याज्ञिकच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. करोडोंच्या फॅन फॉलोइंगमध्ये एक दहशतवाद्याचाही समावेश आहे, जो त्याचा नंबर वन फॅन असल्याचे बोलले जात आहे. हा दहशतवादी म्हणजे ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden). होय, दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन हा बॉलिवूड गायिका अलका याज्ञिकचा नंबर वन फॅन असल्याचे बोलले जात आहे.

एकदा अलका याज्ञिक यांना याबाबत विचारण्यात आले. त्यानंतर अनु रंजन यांच्याशी झालेल्या मुलाखतीत गायिक म्हणाली होती की, "माझी चूक आहे का? ओसामा बिन लादेन जो काही असला तरी त्याच्या आत कुठेतरी एक छोटासा कलाकार असला पाहिजे. तुम्हाला आवडलं तर चांगलंच आहे, नाही का?" 

ओसामाच्या संगणकात सापडलेली अलकाची गाणी

२०११ सालची गोष्ट आहे, जेव्हा अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA (द सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी) ने ओसामा बिन लादेनच्या अबोटाबाद येथील सुरक्षित आश्रय स्थानावर छापा टाकला होता. त्यावेळी सीआयएने एक संगणक जप्त केला होता ज्यामध्ये त्यांना उदित नारायण, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेली अनेक बॉलिवूड चार्टबस्टर गाणी सापडली होती. यात अजनबी मुझे इतना बता (काजोल-अजय देवगणचा चित्रपट प्यार तो होना ही था), दिल तेरा आशिक (माधुरी दीक्षित-सलमान खानचा चित्रपट दिल तेरा आशिक), तू चांद है पूनम का (जाने तमन्ना चित्रपट) या गाण्यांचा समावेश होता.

अलका याज्ञिकला संगीत क्षेत्रात आलेला वाईट अनुभव अनु रंजन यांच्याशी झालेल्या या संवादात अलका याज्ञिक यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या राजकारणावर चर्चा केली. प्रत्येक क्षेत्रात राजकारण असते, असे ती म्हणाली होती. तिच्यासोबतही गलिच्छ राजकारण झाले. तिच्याकडून अनेक गाणी हिसकावून घेतली. एकदा ती गाण्याची रिहर्सल करत राहिली, पण नंतर कळले की ते गाणे एका ज्येष्ठ गायिकेने गायले आहे. अलका याज्ञिकने संगीत क्षेत्रात चार दशके काम केले आणि जवळपास एक हजार चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.

टॅग्स :अलका याज्ञिकओसामा बिन लादेन