‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा हिच्याकडे चित्रपटांची कमतरता नाही. एकापाठोपाठ एक अशा अनेक चित्रपटांत सान्याची वर्णी लागलीय. गतवर्षी सान्या ‘बधाई हो’मध्ये दिसली. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही तर बॉक्सआॅफिसवर कमाईचे अनेक विक्रमही रचले. यानंतर सान्याला अनेक मोठे प्रोजेक्ट मिळाले. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘फोटोग्राफ’ या सिनेमात ती झळकली. पाठोपाठ अनुराग बासूच्या ‘लाईफ इन अ मेट्रो’चा सीक्वलही तिच्या झोळीत पडला. आता सान्याच्या हाती असाच एक मोठा चित्रपट लागला आहे.
सान्या मल्होत्राला लॉटरी! ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा यांच्यासोबत करणार काम!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 16:00 IST
‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा हिच्याकडे चित्रपटांची कमतरता नाही. एकापाठोपाठ एक अशा अनेक चित्रपटांत सान्याची वर्णी लागलीय. आता सान्याच्या हाती असाच एक मोठा चित्रपट लागला आहे.
सान्या मल्होत्राला लॉटरी! ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा यांच्यासोबत करणार काम!!
ठळक मुद्देहिंदी चित्रपटाशिवाय गुनीत मोंगा साऊथ इंडस्ट्रीतही हात आजमावत आहेत. तामिळ चित्रपट ‘सूरासाई पोत्रू’ हा चित्रपट त्या प्रोड्यूस करत आहेत.