Oscars 2018 : आॅस्करसाठी ‘या’ पाच भारतीय चित्रपटांना मिळाले नॉमिनेशन; पण मिळाला नाही आॅस्कर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2018 12:43 PM
सध्या ९०व्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्याची तयारी सुरू असून, जगभरातील चित्रपटांना या सोहळ्यात नामांकने मिळाली आहेत. भारताचा आॅस्करमधील प्रवासाचा हा वृत्तांत...
भारतात सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती केली जाते. विशेष म्हणजे यातील बहुतांश चित्रपटांना प्रेक्षकांची जबरदस्त पसंती मिळत असतानाही भारतीय चित्रपट आॅस्कर पुरस्काराच्या रेसमधून दरवर्षी बाहेर फेकले जातात. वास्तविक काही भारतीय आणि भारतीय चित्रपटांशी संबंधित सेलिब्रिटींनी आॅस्कर पुरस्कारावर नाव ठेवले आहे. पण चित्रपटाला अद्यापपर्यंत एकही पुरस्कार मिळविता आला नाही. मात्र काही भारतीय चित्रपट असे आहेत, ज्यांनी नॉमिनेशनपर्यंतचा प्रवास यशस्वी सर केला आहे. परंतु पुरस्काराची वेळ आली तेव्हा मात्र हे चित्रपट ट्रॉफीच्या शर्यतीत तग धरू शकले नाही. याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत... मदर इंडियामहबूब खान यांनी दिग्दर्शित केलेल्या अन् अभिनेता सुनील दत्त, नर्गिस, राजेंद्रकुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटाला बेस्ट फिल्म इन फॉरेन कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळाले होते. ३०व्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला हा मान मिळाला होता. मात्र पुरस्कार पटकाविण्यास चित्रपट अपयशी ठरला. चित्रपटाचे दिग्दर्शक महबूब खान हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी लॉस एन्जेलिसला पोहोचले होते, परंतु या कॅटेगरीमध्ये ‘नाइट्स आॅफ केबिरिया’ या इटलीच्या चित्रपटाने बाजी मारली. केवळ एका वोटमुळे ‘मदर इंडिया’ स्पर्धेबाहेर फेकला गेला. सलाम बॉम्बेमीरा नायर दिग्दर्शित ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटालादेखील ६१व्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात नॉमिनेशन मिळाले होते. त्यावेळी या चित्रपटाने अखेरपर्यंत फाइट दिली होती. परंतु अखेरीस हा चित्रपट आॅस्कर स्पर्धेच्या बाहेर पडला. हा अवॉर्ड डेन्मार्कच्या ‘पेले द कनक्वेर’ या चित्रपटाला मिळाला होता. लगानमिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान अभिनित ‘लगान’ या चित्रपटालाही ७४व्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात नॉमिनेशन मिळाले होते. परंतु आॅस्करची ट्रॉफी मिळविण्यात चित्रपट अपयशी ठरला. यावेळी बोस्नियनच्या ‘नो मॅनस लॅण्ड’ या चित्रपटाने बाजी मारली होती. लिटिल टेररिस्ट दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा ‘लिटिल टेररिस्ट’ हा शॉर्ट चित्रपट आहे. हा पहिला भारतीय चित्रपट आहे, ज्याला बेस्ट लाइव अॅक्शन शॉट फिल्म या कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाले होते. अखेरीस हा चित्रपट अवॉर्ड मिळवू शकला नाही. हा अवॉर्ड ब्रिटिश चित्रपट ‘वास्प’च्या पदरात पडला. वॉटरजॉन अब्राहम आणि लीजा रे स्टारर ‘वॉटर’ हा आॅस्कर सोहळ्यात एक कॅनेडियन चित्रपट म्हणून निवडला गेला होता. परंतु जगभरात हा चित्रपट इंडो-कॅनेडियन म्हणूनच समोर आला. भारतात काही असामाजिक तत्त्वांना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची शूटिंग श्रीलंका येथे करण्यात आली होती. हा चित्रपट आॅस्कर मिळवेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु ‘द लाइव्ह आॅफ अदर्स’ या जर्मन चित्रपटाने त्यावेळी बाजी मारली.