आलिया भट (Alia Bhatt) व रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सिनेमा ठरला. 9 सप्टेंबरला चित्रपटगृहांत रिलीज झालेला हा सिनेमा गेल्या 4 नोव्हेंबरला OTTवर रिलीज झाला आणि या चित्रपटाने अनेकांना पश्चाताप करायला भाग पाडलं. होय, ‘बायकॉट’ ट्रेंड फॉलो करत ‘ब्रह्मास्त्र’कडे पाठ फिरवणारे अनेकजण आता पश्चाताप करत आहेत. अरेरे, आम्ही या चित्रपटाला का बायकॉट केलं? हा सिनेमा चित्रपटगृहात का बघितला नाही? अशा भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
ओटीटीवर रिलीज होताच अनेकांनी ‘ब्रह्मास्त्र’ पाहिला आणि अनेकांना हा सिनेमा प्रचंड आवडला. अनेकांना आपण हा सिनेमा मोठ्या पडद्यावर का पाहिला नाही? असा पश्चाताप होतोय. आपण बायकॉट ट्रेंडमध्ये वाहवत गेलो आणि थिएटरमध्ये या सिनेमाचा आनंद घेण्यास मुकलो, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
काश.... मी हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला असता...
एक युजर असाच पश्चाताप करताना दिसला. ‘व्वा, ‘ब्रह्मास्त्र’ एक अद्भूत सिनेमा आहे. व्हिज्युअली आणि कॉन्सेप्टच्या दृष्टीनेही. काश, मी हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला असता. पहिल्यांदा मी घरी असा सिनेमा पाहिला. मी चित्रपटात इतका मग्न झालो होतो की माझा फोन मी एकदाही बघितला नाही. आता मी या चित्रपटाच्या दुसºया पार्टची प्रतीक्षा करतोय...,’ असं एका युजरने लिहिलं.
मला खूप वाईट वाटतंय...
मी आज सकाळी ‘ब्रह्मास्त्र’ अर्धा पाहिला आणि आज रात्रीच मी पूर्ण बघेल. चांगला सिनेमा आहे. यात पौराणिक हिंदू संस्कृतीबद्दल सांगितलं आहे. अशा सिनेमाला मी बायकॉट केलं, याचं मला दु:ख आहे. मला असं नको करायला होतं, असं एका युजरने लिहिलं आहे.
माझ्या सारख्या मूर्खांसाठी...
एका युजरने तर हा सिनेमा पुन्हा रिलीज करण्याची मागणी केली. एक विनंती... आमच्यासारख्या मूर्खांसाठी हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज करा... खराब रिव्ह्यू वाचून आम्ही हा सिनेमा चित्रपटगृहांत पाहिला नाही, आम्ही एक चांगला सिनेमा मिस केला..., असं एका युजरने लिहिलं.
‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा रिलीज होताच सोशल मीडियावर बायकॉट ट्रेंड सुरू झाला होता. अनेकांनी वेगवेगळी कारणं देत हा सिनेमा बायकॉट करण्याची मोहिम राबवली आणि अनेक प्रेक्षक या बायकॉट मोहिमेला बळी पडले, असंच सध्या दिसतंय. अनेकांना बायकॉट ट्रेंड फॉलो करून हा सिनेमा थिएटरमध्ये न पाहिल्याबद्दल पश्चाताप होत आहे.अयान मुखर्जीने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा बनण्यासाठी 5वर्षे लागलीत.हा सिनेमा तीन भागांत रिलीज होणार आहे.