Join us  

​‘प्रेक्षक आमचे मायबाप’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2016 12:02 PM

- रूपाली मुधोळकर‘ग्रेट ग्रँड मस्ती’अर्थात ‘जीजीएम’ शुक्रवारी(१५ जुलै) चित्रपटगृहांमध्ये झळकला. अ‍ॅडल्ट कॉमेडी असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी संमिश्र दाद ...

- रूपाली मुधोळकर‘ग्रेट ग्रँड मस्ती’अर्थात ‘जीजीएम’ शुक्रवारी(१५ जुलै) चित्रपटगृहांमध्ये झळकला. अ‍ॅडल्ट कॉमेडी असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी संमिश्र दाद दिली. काहींना हा चित्रपट कंटाळवाणा वाटला तर काहींनी सेक्स कॉमेडी अशीच असणार म्हणून एकदा चित्रपट पाहण्यास काहीही हरकत नाही, असे मत दिले. एकीकडे ‘ग्रेट ग्रँड मस्ती’बद्दल समीक्षक काहीसा नकारात्मक सूर आवळत असताना दुसरीकडे ‘मस्ती’ फ्रेंचाइजी के तीन लीड अ‍ॅक्टर्स अर्थात रितेश देशमुख, आफताब शिवदासानी,विवेक ओबेरॉय व उर्वशी रौतेला या टीमचा प्रमोशनचा धडाका सुरु होता. ‘लोकमत’च्या नागपूर कार्यालयास ‘ग्रेट ग्रँड मस्ती’च्या टीमने भेट दिली. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता रितेश देशमुख याने यादरम्यान ‘www.cnxdigital.comशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या गप्पांचा हा मुलाखतवजा सारांश खास आमच्या वाचकांसाठी...प्रश्न :  रितेश ‘जीजीएम’ एक अ‍ॅडल्ट कॉमेडी आहे. ‘मस्ती’ शृंखलेतील हा तिसरा चित्रपट आधीच्या दोन चित्रपटांपेक्षा कशाप्रकारे वेगळा आहे.रितेश : ‘मस्ती’ हा तीन विवाहित पुरूषांची कथा होती. जे घराबाहेर ‘सुख’ शोधतात. ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटात त्यांच्या कॉलेज रियुनियनशी संबंधित कथा होती. मात्र ‘जीजीएम’ पूर्णपणे वेगळ्या अँगलची कथा आहे. हा चित्रपट म्हणजे एक हॉरर सेक्स कॉमेडी आहे. माझ्यामते, पहिल्यांदा हॉरर सेक्स कॉमेडी आपल्याला पाहायला मिळणार आहे.प्रश्न: ‘जीजीएम’ रिलीज झालाय आणि समीक्षकांची प्रतिक्रिया काहीशी नकारात्मक आहे. असे असताना चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नेमकी कुठली योजना डोक्यात आहे.रितेश : रिव्ह्युजचे म्हणाल तर ‘मस्ती’ आणि ‘ग्रँड मस्ती’बाबतही ते चांगले नव्हतेचं. आम्ही समीक्षकांच्या प्रतिक्रियांचा, त्यांच्या मतांचा आदर करतो. मात्र माझ्या मते, प्रेक्षक आमचे मायबाप आहेत.शेवटचा निर्णय हा प्रेक्षकांचाच असतो. तेव्हा चित्रपटाच्या यशाअपयशाबद्दल अंदाज बांधण्याऐवजी आपल्याला रविवारच्या रिस्पॉन्सची प्रतीक्षा करायला हवी. माझ्यामते, चित्रपट प्रेक्षकांना आवडणार आणि आवडणारच...प्रश्न: सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजावरून सध्या बॉलिवूडमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ‘जीजीएम’बद्दल आपला अनुभव कसा राहिला?रितेश : खरे तर हा सेन्सॉर बोर्ड हा बोर्ड नाही तर सर्टिफिकेशन बोर्ड आहे. अर्थात सेन्सॉर बोर्डाला आमच्या चित्रपटांमधील ज्या दृश्यांवर आक्षेप होता, ते आम्ही गाळले. आम्ही सेन्सॉर बोर्डाचा निर्णय मान्य केला. पण माझे स्वत:चे मत विचाराल तर काय पाहायचे, काय नाही, हा निर्णय सर्वस्वी प्रेक्षकांचाच असायला हवा.प्रश्न : ‘जीजीएम’ रिलीजच्या बºयाच आधी लीक झाला. आॅनलाईन लीकमुळे रिलीज डेटही तुम्हाला बदलावी लागली. याबद्दल काय सांगशील?रितेश : निश्चितपणे पायरेसी, आॅनलाईन लीक हा बॉलिवूडसाठी मोठा धोका आहे. ‘जीजीएम’बद्दल म्हणाल तर मी या मुद्यावर काहीही बोलणार नाही. कारण याबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ आणि केवळ प्रॉडक्शन हाऊसला आहे.प्रश्न : रितेश ‘लय भारी’, ‘एक विलेन’ यातील तुझ्या भूमिकेची मोठी प्रशंसा झाली. अशावेळी ‘जीजीएम’सारखा अ‍ॅडल्ट कॉमेडी चित्रपट स्वीकारताना डोक्यात काय विचार असतो?रितेश : काहीही विचार नसतो. खरे तर प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे केवळ हा एकच विषय आहे. माझ्या चाहत्यांना मी अ‍ॅडल्ट कॉमेडी करतानाही आवडतो. हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. प्रश्न :  रितेश २०१३ मध्ये तू यापुढे कधीही सेक्स कॉमेडी करणार नाही,असे म्हणाला होतास. मग तरिही हा चित्रपट तू स्वीकारासच. हे कसे?रितेश : हो, तसे म्हणालो होतो. पण हा चित्रपट म्हणजे सेक्स कॉमेडी नाही तर हॉरर कॉमेडी आहे. मला ही थीम आवडली. शिवाय ‘जीजीएम’चे दिग्दर्शक इंद्रकुमार यांना मी नकार देऊच शकत नाही. माझे त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे. हॉरर कॉमेडी मला स्वत: अनुभवायची होती.प्रश्न : एका मराठी वाहिनीवर ‘विकता का प्रश्न’ हा रिअ‍ॅलिटी शो घेऊन येत आहेत, हे खरे आहे का?रितेश : होय, आॅगस्टमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात मी या शोचे शूटींग सुरु करतो आहे. हा एक इंटरेस्टिंग क्वीज शो आहे. प्रेक्षकाना होस्ट म्हणून केवळ मीच नाही तर हा शो सुद्धा नक्की आवडेल, असे मला वाटते.प्रश्न : रितेश, तुझ्या नव्या  हेअरस्टाईलमागचे ‘रहस्य’ काय?रितेश : (खळखळून हसत) रहस्य वगैरे काही नाही. माझा ‘बँजो’ हा सिनेमा येतो आहे. त्यासाठी मी केस वाढवले होते. शूटींग संपले. सध्या नवे काहीही काम नव्हते. त्यामुळे नवा प्रयोग म्हणून ही हेअरस्टाईल मी कॅरी केली आहे, एवढेच.प्रश्न : जेनेलियासोबत मराठी सिनेमा करणे तुझे स्वप्न आहे. मग हे स्वप्न कधी पूर्ण होणार, असे वाटतेयं.रितेश : सध्या तरी नाही. मी ‘माऊली’ आणि ‘छत्रपती शिवाजी’ हे दोन मराठी सिनेमे करतोय. पण त्यात जेनेलिया नाही. पण हे स्वप्न पूर्ण होणार, यावर मात्र माझा विश्वास आहे.