तर वर्ल्डवायज हे कलेक्शन साडेतीनशे कोटींपेक्षा अधिक असल्याचे समजते. दरम्यान, चित्रपटाला प्रचंड विरोध झाल्यामुळे त्याचा परिणाम कमाईवरही झाला आहे. करणी सेनेकडून चित्रपट बघितल्यानंतर विरोधाची धार काहीशी कमी झाली असली तरी, राजस्थानात अजूनही धुसफूस सुरूच आहे. दरम्यान, राजस्थान हायकोर्टाने चित्रपटाला हिरवा कंदील दाखविल्याने आता तिथेही चित्रपट कमाईचा उच्चांक गाठेल असेच काहीसे चित्र आहे. दरम्यान, कोर्टाने चित्रपटाचे कौतुक करताना म्हटले की, हा चित्रपट राज्यात प्रदर्शित व्हावा यासाठी सर्व व्यवस्था करायला हवी. चित्रपटात दीपिकाने राणी पद्मावतीची भूमिका साकारली. शाहिद कपूर राजा रतन सिंगच्या भूमिकेत असून, रणवीर सिंगने अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका केली आहे. रणवीर सिंगची भूमिका सर्वाधिक चर्चेत राहिली आहे. खिलजी साकारण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे.#Padmaavat continues to score... [Week 2] Fri 10 cr, Sat 16 cr, Sun 20 cr, Mon 7 cr, Tue 6 cr, Wed 5.50 cr. Total: ₹ 231 cr. India biz.— taran adarsh (@taran_adarsh) February 8, 2018
Padmaavat Box Office Collection : ‘पद्मावत’चा जोर कायम; वाचा आतापर्यंतचे कलेक्शन !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 1:31 PM
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा प्रचंड वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावत असल्याचे दिसून येत आहे. प्रेक्षकांच्या ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा प्रचंड वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावत असल्याचे दिसून येत आहे. प्रेक्षकांच्या मते, चित्रपटातील एक एक फ्रेम खूपच सुंदर आहे. दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर या तिन्ही कलाकारांच्या अभिनयाचे तर प्रेक्षकांकडून चांगलेच गोडवे गायिले जात आहेत. केवळ प्रेक्षकच नव्हे तर बºयाचशा बॉलिवूड स्टार्सनीही या तिन्ही कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. त्याचबरोबर संजय लीला भन्साळी यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. असो, चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचे झाल्यास अजूनही बॉक्स आॅफिसवर ‘पद्मावत’चा दबदबा कायम आहे. चित्रपटाने केवळ चारच दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले. तर दुसºया आठवड्याच्या शुक्रवारी चित्रपटाने १० कोटी, शनिवारी १६ कोटी अन् रविवारी २० कोटी रुपयांची कमाई केली. त्याचबरोबर सोमवारीदेखील चित्रपटाने ७ कोटींच्या कमाईपर्यंत मजल मारली. मंगळवारी ६ कोटी तर बुधवारी ५.५० कोटी रुपयांचे जबरदस्त कलेक्शन केले आहे. आतापर्यंत चित्रपटाने एकूण २३१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.