‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी अतिशय गंभीर विषय उत्कृष्टपणे पडद्यावर मांडला आहे. अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात अक्षयचा अभिनयही दमदार आहे. सामाजिक विषयावर आधारित या चित्रपटातून सॅनिटरी नॅपकिन याची जनजागृती करण्यात आली.}}}} ">Early estimates for @akshaykumar 's #Padman Day 1 All-India nett has come in.. It's ₹ 10 Crs..Decent Number for Day 1 given the subject.. Should see good growth today and tomorrow.. (Sat and Sun)— Ramesh Bala (@rameshlaus) February 10, 2018
Padman Box Office Collection Day 1: ‘पॅडमॅन’ची दमदार ओपनिंग, वाचा पहिल्या दिवसाची कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 12:42 PM
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा बहुप्रतीक्षित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली ओपनिंग केल्याचे समोर ...
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा बहुप्रतीक्षित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली ओपनिंग केल्याचे समोर आले. वास्तविक ‘पद्मावत’सह अक्षयचेच ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ (१३.२० कोटी) आणि ‘जॉली एलएलबी-२’ (१३.१० कोटी) सारखी या चित्रपटाला ओपनिंग मिळाली नाही. ट्रेड एनालिस्ट रमेश बाळाने केलेल्या ट्विटनुसार, अक्षयच्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर पहिल्याच दिवशी १० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. वीकेण्डचे अजून दोन दिवस शिल्लक असल्याने हा चित्रपट चांगली कमाई करू शकेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, अक्षयचा हा चित्रपट सुरुवातीला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु ‘पद्मावत’ही त्याच दिवशी प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ९ फेब्रुवारी करण्यात आली होती. पहिल्या दिवशी ज्यापद्धतीने चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला त्यावरून चित्रपट लवकरच शंभर कोटी क्लबमध्ये स्थान मिळवेल, असे बोलले जात आहे. चित्रपटात अक्षयचा अभिनय खूपच एनेर्जेटिक असून, लोकांना तो भावत आहे. त्यामुळे २०१८ मध्ये शंभर कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळविणारा हा दुसरा चित्रपट ठरू शकेल काय हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘पद्मावत’ने पहिल्याच आठवड्यात १०० कोटी रुपयांची कमाई केली होती. अशात ‘पॅडमॅन’कडूनही ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.