Join us

Padman Box Office Collection : सातव्या दिवसापर्यंत ‘पॅडमॅन’ने केली इतक्या कोटींची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 2:00 PM

खिलाडी अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ने बॉक्स आॅफिसवर मोठा धमाका केला नसला तरी, कासवगतीने का होईना चित्रपट जेमतेम कमाई करण्यात यशस्वी झाला ...

खिलाडी अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ने बॉक्स आॅफिसवर मोठा धमाका केला नसला तरी, कासवगतीने का होईना चित्रपट जेमतेम कमाई करण्यात यशस्वी झाला आहे. दिवसेंदिवस चित्रपटाच्या कमाईची गती खूपच कमी झाल्याने सातव्या दिवशी हा चित्रपट केवळ चार कोटी रूपयांचीच कमाई करू शकला. त्यामुळे पहिल्या आठवड्यात चित्रपट बॉक्स आॅफिसवर ६३.०९ कोटी रूपयांची कमाई करण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान, ‘पॅडमॅन’ने वीकेण्डला ४० कोटी रूपयांचा गल्ला जमविला होता. मात्र आता अक्षयच्या ‘पॅडमॅन’ला मनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘अय्यारी’ आणि ‘ब्लॅक पॅँथर’ या हॉलिवूड चित्रपटाला फाइट द्यावी लागणार असल्याने चित्रपटाच्या कमाईची गती आणखीच कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अक्षयकडून चिंता व्यक्त करणे स्वाभाविक आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांच्या आकड्यांनुसार, ९ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘पॅडमॅन’ने पहिल्याच दिवशी १०.२६ कोटी रूपयांची कमाई केली, दुसºया दिवशी १३.६८ कोटी, तिसºया दिवशी १६.११ कोटी, चौथ्या दिवशी ५.८७ कोटी, तर पाचव्या दिवशी ६.१२ कोटी रूपयांची कमाई केली. बुधवारी कमाईमध्ये काहीशी वाढ होताना आश्चर्यकारकपणे चित्रपटाने ७.०५ कोटींचे कलेक्शन केले. ६० कोटी रूपयांमध्ये बनविलेल्या या चित्रपटात अक्षयकुमारसह, सोनम कपूर, राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे समीक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. दरम्यान, ‘पॅडमॅन’चे वैशिष्ट्ये म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केले असून, त्याची कथा पडद्यावर अतिशय उत्तमरीत्या मांडण्यात ते यशस्वी झाले आहेत. अक्षयकुमारने अरुणाचलम यांची भूमिका खूपच उत्कृष्टरीत्या पडद्यावर साकारली आहे. ‘पॅडमॅन’ची कथा सॅनिटरी नॅपकिन संदर्भात जनजागृती करण्याविषयी आहे.