गत १४ फेबु्रवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. भारताने या हल्ल्याचा पुरेपूर बदला घेत, पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. बालोकेट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने १००० किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केला. त्यात जवळपास ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. भारताच्या या बदल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने काय करावे तर भारताच्या चित्रपटांवर बंदी घातली. भारताचा कुठलाही चित्रपट आता पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही, अशी घोषणा पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी केली.
हवाई सर्जिकल स्ट्राईकने चवताळलेल्या पाकिस्तानने घातली भारतीय चित्रपटांवर बंदी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 11:04 AM
भारताच्या या बदल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने काय करावे तर भारताच्या चित्रपटांवर बंदी घातली. भारताचा कुठलाही चित्रपट आता पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही, अशी घोषणा पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी केली.
ठळक मुद्देपाकिस्तानमधील सिनेमा एक्झीबेटर असोसिएशनने भारतीय चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.