काल पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भालाफेक स्पर्धा झाली. यात भारताच्या नीरज चोप्रापेक्षा वरचढ कामगिरी करत पाकिस्तानच्या अरशद नदीमने गोल्ड मेडल मिळवलं. अरशदच्या 'सुवर्ण'कामगिरीमुळे जगभरातून त्यांचं अभिनंदन होतंय. अरशदने सुवर्णपदक मिळवल्याने नीरज चोप्राला सिल्व्हर पदावर समाधान मानावं लागलं. अशातच अरशदने गोल्ड मेडल जिंकल्याने सुप्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्याने त्याला बक्षीस म्हणून मोठी रक्कम जाहीर केलीय.
पाकिस्तानी अभिनेत्याने अरशदसाठी जाहीर केला इनाम
बॉलिवूडमध्ये काम केलेला सुप्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेता अली जफरने ऑलिम्पिकमध्ये अरशद नदीमने गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. याशिवाय त्याच्यासाठी लाखोंचा इनाम जाहीर केलाय. अली म्हणतो, "अरशद नदीमने ९२.९७ थ्रो करत रेकॉर्ड ब्रेक केला अन् सुवर्णपदक मिळवलं. मी अली फाऊंडेशनच्या माध्यमातून दहा लाख इनाम जाहीर करतो. मी पाकिस्तान सरकार आणि मुख्यमंत्री शहबाज यांनी विनंती करतो की एका हिरोसारखं अरशदचं स्वागत करावं."
अरशदच्या नावाने स्पोर्ट्स अकादमी उघडावी: अली जफर
अली जफरने पुढे सरकारला आवाहन केलंय की, "अरशद नदीमच्या नावाने स्पोर्ट्स अकादमी उघडावी. आपल्या खेळाडूंना त्यांच्या हक्काचा सपोर्ट मिळाला तर आपले खेळाडू अशीच १० सुवर्णपदकं जिंकतील." अशाप्रकारे अली जफरने अरशद नदीमचं कौतुक केलंय. काल पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि भारताचा नीरज चोप्रा अशी सुवर्णपदकासाठी थेट लढत रात्री रंगली. त्यात पाकिस्तानच्या अर्शद नदीमने बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्रा यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या.
अरशदने नीरज चोप्राला हरवलं
भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात ९०.४५ मीटर लांब भालाफेक केली. ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी होती. पण पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर लांब अंतरावर भाला फेकत ऑलिम्पिक रेकॉर्ड सेट केला आणि सुवर्णपदक आपल्या नावे केले. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटरसन याने ८८.५ मीटर कामगिरीसह कांस्यपदकावर नाव कोरले.