Join us

'कमी दर्जाच्या फालतू मालिका'; पाकिस्तानी अभिनेत्याची भारतीय मालिकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 11:53 AM

या अभिनेत्याने पाकिस्तानी मालिकांचं कौतुक करत भारतीय मालिकांना फालतू म्हटलं आहे.

पाकिस्तानी अभिनेता आणि सूत्रसंचालक यासिर हुसैन याने भारतीय टीव्ही मालिकांवर टीका केली आहे. इतकंच नाही तर या सासू-सुनेवर आधारित असलेल्या भारतीय मालिका फालतू असतात असंही त्याने म्हटलं आहे. त्याची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर त्याने  या मालिकांचा उल्लेख विष म्हणूनही केला आहे.यासिर हुसैन याने नुकतीच 'समथिंग हाऊट'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने भारतीय मालिकांसोबत पाकिस्तानी नाटकांवरही टीका केली आहे. माझ्या मुलाने या फिल्म इंडस्ट्रीत येऊ नये, असंही त्याने म्हटलं आहे.

पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीविषयी नेमकं काय म्हणाला यासिर हुसैन?

जावेद इक्बालला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासिरने प्रथम पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीविषयी भाष्य केलं. आमची इंडस्ट्री चांगली नाही. माझ्या मुलाने या क्षेत्रात यावं असं मला जराही वाटत नाही. ही कलाकार मंडळी जे करतात ते काम आहे का? अभिनेत्याचं काम उत्तम अभिनय करणं असतं. हे असं क्षेत्र आहे जिथे तुम्ही तुमची कला दाखवली पाहिजे.  तुम्ही तुमच्या कलेचा प्रचार केला पाहिजे. पण, आम्हाला मात्र कायम किरकोळ वाईट कामांची ऑफर दिली जाते, असं यासिर म्हणाला.

भारतीय मालिका म्हणजे विष

पाकिस्तानी नाटकांविषयी बोलत असताना यासिने भारतीय मालिकांवर टीका केली. पाकिस्तानी नाटकं भारत आणि अन्य देशांमध्ये लोकप्रिय होतात,असं म्हणत त्याला प्रश्न विचारण्यात आला. यावर, तुम्ही भारतीय मालिका पाहिल्या आहेत का? ज्या देशात कमी दर्जाच्या फालतू मालिकांची निर्मिती होते ते लोक नक्कीच आपल्या (पाकिस्तानी) मालिका पाहतात. आपले शो फक्त तेच लोक पाहतात ज्यांकडे स्वत:चे चांगले शो नाहीत. भारतात विषारी मालिका खूप आहेत. त्यामुळे आपल्या मालिका त्यांच्यापेक्षा चांगल्या असल्यामुळे ते आपल्या मालिका पाहतात.

दरम्यान, यापूर्वीही यासिरने भारतीय फिल्म इंडस्ट्रीवर टीका केली होती. अभिनेता शाहरुख खान याच्या 'पठाण' सिनेमाला त्याने 'स्टोरीलेस व्हिडीओ गेम', असं म्हटलं होतं.

टॅग्स :बॉलिवूडटिव्ही कलाकारसेलिब्रिटीसिनेमापाकिस्तान