पाकिस्तानी अभिनेत्री हिरा मानी (Hira Mani) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात अभिनेत्री म्हणाली की, टोमणे मारणारे पती चांगले असतात. याने महिला त्यांचं वजन कमी करतात. सोबतच अभिनेत्री बॉलिवूड डीवा करिना कपूर खानला बॉडी शेमही केलं. हिरा मानीला तिच्या दोन्ही वक्तव्यासाठी ट्रोल केलं जात आहे.
हिरा मानी आणि तिचा पती एका मुलखतीत बसले होते. जिथे अभिनेत्री तिच्या वाढलेल्या वजनावर बोलली की, यावेळी जे मी वजन कमी केलं त्यासाठी माझ्याकडे कोणताही ट्रेनर नाही. माझ्याकडे बस एक ट्रेनर होता तो होता मानी. याआधीच्या जेवढ्या ट्रेनरने माझं वजन कमी केलं नसेल तेवढं याने केलं. माझं वजन फार वाढलं होतं. माझं वजन ६४ किलो झालं होतं. एक दिवस मी माझा ड्रामा पाहिला होता तर पाहून म्हणाले होते की, ही कोण जाड बाई आहे. पतीनेच माझं ३ महिन्यात १० किलो वजन कमी केलं. जे ट्रेनर करू शकला नाही ते माझ्या पतीने केलं.
ती म्हणाली की, 'हा मला इतके टोमणे मारतो की, कतरिनाला बघ, करिना तर आता जाड झाली आहे. दीपिकाला बघ. मी म्हणते की, मी कतरिना, दीपिका नाहीये. मला दोन मुलं आहेत. मला वाटतं टोमणे मारणारे पती चांगले असतात. त्याने महिला वजन कमी करतात'.
हिरा मानीचा हा व्हिडीओ समोर आल्यापासून ती वादात सापडली आहे. करीनाच्या फॅन्सने हिरावर टिका केली आहे. करीनाला जाड म्हटल्याने यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. तुझे विचार विषारी असल्याची टिका यूजर्सनी तिच्यावर केली आहे. एका यूजरने लिहिलं की, पब्लिक प्लॅटफॉर्मवर कुणाला बॉडी शेम करणं आणि वादग्रस्त वक्तव्य करणं चुकीचं आहे.