Join us

"सानियाला सोबत ठेवून त्याने ४ लग्न केली असती तर...", पाकिस्तानी अभिनेत्रीचा शोएबला फुल सपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 13:51 IST

"शोएब मलिकने असं काय चुकीचं केलं आहे? ", पाकिस्तानी अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, म्हणते- सानियाने स्वत:च खुला केला....

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सानियाचा एक्स पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्न केलं. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केल्याने शोएब मलिकला ट्रोल करण्यात आलं होतं. भारतीय चाहत्यांबरोबरच पाकिस्तानी चाहतेही त्याच्यावर नाराज होते. तेव्हा पाकिस्तानी अभिनेत्री हीरा सूमरोने शोएबला पाठिंबा दिला होता. आता पुन्हा तिने सानिया आणि शोएबबद्दल भाष्य केलं आहे. 

हीरा सूमरोने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शोएबला पुन्हा पाठिंबा देत त्याचं समर्थन केलं आहे. एका पॉडकास्टमध्ये ती म्हणाली, "शोएब मलिकने असं काय चुकीचं केलं आहे? ज्यामुळे एवढा गदारोळ झाला आहे, हे मला कळत नाही." त्यावर होस्टने तिला "शोएबने भारतीय सानियाला सोडून दिलं. त्यामुळे लोक त्याच्यावर नाराज आहेत," असं उत्तर दिलं. तेव्हा हीरा शोएबला पाठिंबा देत म्हणाली, "तो सानिया मिर्झाला सोबत ठेवूनही ४ लग्न करू शकला असता. मला कळत नाही लोकांना कसलं दु:ख आहे. वहिनीला सोडलं याचं की दुसरी वहिनी घेऊन आला याचं?" 

यावर होस्ट म्हणाला की भारतीय वहिनीला सोडलं याचं दु:ख आहे. त्यावर हीरा शोएबची बाजू घेऊन म्हणते, "सानियाने स्वत: खुला केला आहे. कदाचित तिला शोएब कळलाच नसेल." त्यावर होस्टने सानियाची बाजू घेतली आणि म्हणाला, "कदाचित शोएबचं बाहेर अफेअर चालू असेल, असंही होऊ शकतं". होस्टच्या या प्रश्नावर हीरा पुढे म्हणते, "अफेअर करणारे लोक लग्न करत नाहीत. आजकाल लग्नानंतरही लोकांच्या १० गर्लफ्रेंड असतात." 

हिरा सुमेरोने शोएबच्या लग्नानंतर त्याला पाठिंबा दिला होता. तेव्हा तिला ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. दरम्यान, शोएब आणि सानियाने २०१०मध्ये निकाह केला होता. त्यांना इझहान हा मुलगा आहे. सानियाने शोएबशी खुला करत घटस्फोट घेतला आहे. 

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकऑफ द फिल्ड