Join us

पाकी अभिनेत्री वीणा मलिकचे असंवेदनशील ट्विट, पीएम नरेंद्र मोदींची उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 12:42 IST

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने पुन्हा एकदा भारताला डिवचत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे.

ठळक मुद्देवीणा मलिकने यापूर्वी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्याबद्दलही असेच असंवेदनशील ट्विट केले होते.

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने पुन्हा एकदा भारताला डिवचत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे.  सोमवारी अचानक रडारवरून गायब झालेल्या भारतीय हवाई दलाच्या मालवाहतूक विमानावरून वीणा मलिकने एक असंवेदनशील ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने नरेंद्र मोदी यांचीही खिल्ली उडवली आहे.

#IAF An-32, कोसळलेले नाही. वातावरण खूप खराब आहे आणि रडार याचा शोध घेऊ शकत नाहीये, असे ट्विट करत वीणाने त्यात पीएम नरेंद्र मोदी, भारतीय हवाई दलास टॅग केले आहे.

साहजिकच या ट्विटवरून वीणा ट्रोल होतेय. ‘सवंग लोकप्रियतेसाठी पाकिस्तानी काहीही करतात. खोटे बोलणे हेच यांचे काम. काम मिळत नसल्याने आता यांनी हे उपद्व्याप सुुरू केले आहेत. अशाच वागण्यामुळे तुम्हाला बॉलिवूडमधून हाकलले गेले,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.भारतीय हवाई दलाचे मालवाहतूक विमान सोमवारी अचानक रडारवरून गायब झाले होते. हे विमान दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. पण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.  त्या विमानामध्ये 8 कर्मचारी व 5 प्रवासी असे 13 जण होते. त्या विमानाचा आणि त्यातील प्रवाशांचा 12 तासांहून अधिक काळ उलटून गेला तरी थांगपत्ता लागलेला नव्हता.  

 विंग कमांडर अभिनंदन यांचीही उडवली होती खिल्लीवीणा मलिकने यापूर्वी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्याबद्दलही असेच असंवेदनशील ट्विट केले होते. बॉलिवूडच्या अभिनेत्यांना लक्ष्य करत, ‘माझ्या बॉलिवूडच्या मित्रांनो, आमच्याशी पंगा घेऊ नका,’ असे ट्विट तिने केले होते. शिवाय अभिनंदन यांचा फोटो शेअर करत, ‘अभी अभी तो आए हो...अच्छा मेहमाननवाजी होगी आपकी,’ असे लिहिले होते.

टॅग्स :नरेंद्र मोदीपाकिस्तान