सध्या सोशल मीडियावर एका पाकिस्तानी अभिनेत्रीचा (Pakistani Actress) फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री यासरा रिझवी(Yasra Rizvi) साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत असून तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यासराला नेमकं काय झालं? तिला कोणी मारहाण केली? असा प्रश्न नेटकऱ्यांमध्ये चर्चिला जात आहे. यासराने तिचे साळखदंडातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यामागील सत्य सांगितलं आहे.
यासराने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने साजशृंगार केला असून या अवस्थेत तिला साखळदंडाने बांधल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत तिने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने स्त्रीच्या मनाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे महिला किती बंधनात असतात हेच सांगण्याचा प्रयत्न तिने केला आहे.
"लग्न करणं किंवा न करणं हा प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा निर्णय असतो. तिने कोणाशी लग्न करावं, कसं करावं किंवा लग्न का करावं हे सगळं ठरवण्याचा मुलभूत अधिकार माणसाला आहे. हा निर्णय घेण्यात जर एखाद्याकडून चूक झाली तर त्याच सुधारणा करता येऊ शकते. पण, हा मुलभूत अधिकारदेखील त्या व्यक्तीचा आहे", असं यासराने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या पोस्टमधून यासराने महिलांच्या अधिकाराबाबत तिचं मत मांडलं आहे. महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा असं तिचं मत आहे. त्यांमुळेच स्त्रियांनी कोणासोबत लग्न करावं किंवा घटस्फोट घ्यावा हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे तिच्यावर कोणीही दबाव टाकता कामा नये, असंही यासरा या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
Cruise Drug Case: आर्यनसह अटकेत असलेल्या आरोपींसाठी कुटुंबीयांनी आणलं बर्गर?
दरम्यान, यासरा ही पाकिस्तानी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कलाविश्वाप्रमाणेच यासरा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती बेधडकपणे तिची मत मांडत असते.विशेष म्हणजे आता तिने केलेल्या पोस्टला अनेकांनी पाठिंबादेखील दर्शवला आहे.