Join us  

Video: इब्राहिम अली खानला चीअर करताना दिसली पलक तिवारी; पापाराझींना पाहताच लाजली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:06 PM

पलक आणि इब्राहिम अली खान गेल्या वर्षभरापासून डेट करत आहेत.

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan)  श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीला (Palak Tiwari)  डेट करत आहे. अनेकदा हे दोघं स्टारकीड्स हातात हात घालून इव्हेंट, डिनर डेटला पोहोचले आहेत. आता नुकतंच इब्राहिम अली खानच्या फुटबॉल मॅचदरम्यान त्याला चीअर करण्यासाठी पलक तिवारी आलेली दिसली. यावेळी पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं हसू थांबतच नव्हतं. पलकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पलक आणि इब्राहिम अली खान गेल्या वर्षभरापासून डेट करत आहेत. दोघांनी अद्याप त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी नेटकऱ्यांची त्यांच्यावर नजर आहे. नुकतंच इब्राहिमच्या फुटबॉल मॅचदरम्यान पलक तिवारीने हजेरी लावली. मित्रांसोबत बसून ती इब्राहिमला चीअर करण्यासाठी आली होती. मैदानात इब्राहिम ऑरेंज जर्सी घालून होता. टायगर श्रॉफ त्याच टीममध्ये होता. तर पलक तिवारी तिच्या दोन मित्रांसोबत ऑडियन्समध्ये बसलेली दिसत आहे. क्रॉप टॉप आणि जीन्स असा तिचा कॅज्युअल लूक आहे. पापाराझींची जेव्हा तिच्यावर नजर गेली तेव्हा ती लाजली. तिच्या चेहऱ्यावरचं हसूनही थांबत नव्हतं. 

पलक तिवारी इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबासोबत गोवा ट्रीपवरही गेली होती. जेव्हा अमृता सिंह, सारा अली खान विमानतळावर आले तेव्हा मागून पलकही बाहेर येताना दिसली. तेव्हाच पलकही त्यांच्यासोबत ट्रीपवर गेली होती असा अंदाज लावण्यात आला होता. 

टॅग्स :इब्राहिम अली खानबॉलिवूडपलक तिवारीरिलेशनशिपसोशल मीडिया