अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) अनेकदा सोबत दिसले आहेत. इव्हेंट, पार्टी, फ्रेंड्ससोबत आऊटिंग यावेळी दोघंही कपलसारखे आले आहेत. त्यामुळे त्यांचं अफेअर असून अगदी ते लग्न करणार अशीही चर्चा सोशल मीडियावर झाली. पलक इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबासोबत गोव्यालाही गेली होती. पण आता पलकने दोघांचं नक्की कसं नातं आहे यावर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत पलक तिवारीला इब्राहिमसोबतच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, "मी आणि इब्राहिम फक्त पब्लिक आणि सोशल गॅदरिंग्सला भेटतो. आम्ही दोघंही संपर्कात नाही किंवा एकमेकांना मेसेजही करत नाही. माझं नाव आणखी सात मुलांसोबतही जोडलं गेलं होतं. मीडियानुसार मी त्यांना डेट करत होते. पण असं काहीच नव्हतं. इब्राहिम माझा फक्त मित्र आहे. मला त्याच्यासोबत गप्पा मारायला आवडतं. तो सोबत असला की मजा येते. एक माणूस म्हणून तो खूप छान आहे. आमच्यात नातं असं काही नाहीए. तो त्याच्या कामातही खूप चांगला आहे आणि लवकरच पदार्पण करणार आहे."
नुकत्याच झालेल्या दिवाळी पार्टीतही इब्राहिम आणि पलक सोबत दिसले होते. इब्राहिमने विजय वर्मा आणि तमन्नाशी इब्राहिमची भेट करुन दिली होती. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. अनेकदा पापाराझींच्या गर्दीत इब्राहिम पलकला सुरक्षित ठेवताना दिसला. तर कधी तो तिचा हात पकडून तिला गाडीत बसवताना दिसला. पलक त्याच्या पटौदी हाऊसमध्येही गेल्याची शंका नेटकऱ्यांना आली होती. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
पलक तिवारीने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' म्हणून पदार्पण केलं होतं. तर इब्राहिमने करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. लवकरच तो 'सरजमीं' या थ्रिलर सिनेमातून पदार्पण करणार आहे.